एका वर्षापेक्षा कमी कालावधीत 1 लाख रुपयांचे झाले 7 लाख

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आता भारतीय शेअर बाजाराने जोरदार पुनरागमन केले आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीने विक्रमी पातळी गाठली आहे.

ज्या शेअर्समध्ये लक्षणीय घट झाली आहे, ते देखील मोठ्या प्रमाणात पुन्हा आपल्या जागेवर आले आहेत. यादरम्यान, शेअर बाजारामध्ये असे काही शेअर्स आहेत ज्यामुळे गुंतवणूकदार श्रीमंत झाले आहेत.

निवडक शेअर्समध्ये 600 टक्क्यांहून अधिक रिटर्न मिळाले आहेत आणि तेही एका वर्षापेक्षा कमी कालावधीत. चला या शेअर्स बद्दल जाणून घेऊया.

आलोक इंडस्ट्रीज :- आलोक इंडस्ट्रीज हा असा शेअर आहे ज्याने एका वर्षापेक्षा कमी कालावधीत गुंतवणूकदारांच्या भांडवलात अनेक पटींनी वाढ केली आहे. या वस्त्रोद्योग कंपनीने 2020 मध्ये 620 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावला आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हा शेअर 3 रुपयांवर होता, तर सध्या तो 22 रुपयांवर आहे. या प्रकारच्या रिटर्नमुळे गुंतवणूकदारांचे 1 लाख आजच्या काळामध्ये 7 लाख झाले असतील.

अदानी ग्रीन एनर्जी :- अदानी ग्रीन एनर्जी ही एक अक्षय उर्जा कंपनी आहे, जी जगातील आघाडीच्या सौर कंपन्यांपैकी एक आहे. गेल्या वर्षभरापासून कंपनीच्या शेअरने 557 टक्क्यांहून अधिक उत्पन्न मिळवून दिले आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर 166 रुपये होता आणि सध्या तो 1091 रुपयांच्या आसपास आहे. 557 टक्के रिटर्न सह गुंतवणूकदारांचे 1 लाख आजच्या काळामध्ये 5.5 लाख झाले असतील.

लॉरस लॅब :- या फार्मा स्टॉकने आतापर्यंत 307 टक्क्यांची शानदार कमाई केली आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत महामारी दरम्यानची विक्री सुमारे 60 टक्क्यांनी वाढून 1,127 कोटी रुपयांवर गेली आहे.

त्याच वेळी निव्वळ नफा 299 टक्क्यांनी वाढून 237 कोटी रुपये झाला. कंपनीच्या शेअरची किंमत सध्या सुमारे 293 रुपये आहे.

तर 31 डिसेंबर रोजी याची किंमत 71.95 रुपये होती. यावेळी कंपनीने 307 टक्के परतावा दिला. गुंतवणूकदारांचे 1 लाख आजच्या काळामध्ये 4 लाख झाले असतील.

ह्या शेअर्सने पैसे केले दुप्पट :- सुमारे 200 टक्के किंवा त्याहून अधिक परतावा देऊन गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केलेल्या शेर्समध्ये अ‍ॅल्किल अ‍ॅमिन आणि ग्रॅन्युल इंडिया यांचा समावेश आहे.

100-200 टक्के परतावा देणाऱ्या अन्य शेअर्समध्ये डिक्सन टेक्नॉलॉजीज, नवीन फ्लोरिन, बिर्लासॉफ्ट, वैभव ग्लोबल, टाटा कम्युनिकेशन्स,

इंडियामार्ट, एस्कॉर्ट्स, दीपक नाइट्राइट, जेबी केमिकल्स, अदानी गॅस, इंडिया सिमेंट्स आणि अ‍ॅडव्हान्स एन्झाईम्स यांचा समावेश आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment