रिक्षा – दुचाकीच्या अपघातात रिक्षा चालक ठार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-प्रवाशी रिक्षा व दुचाकींचा अपघात होऊन यामध्ये रिक्षा चालक ठार झाला आहे. हि घटनाला श्रीरामपूर येथे घडली आहे. दरम्यान या अपघातात रिक्षा मधील एक प्रवाशी महिला जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथून रिक्षा प्रवांशी घेवून शहरात येत असताना समोरुन आलेल्या दुचाकीची रिक्षाला धडक बसली.

या अपघातात जखमी रिक्षा चालक आतिश भास्कर शिंदे (वय. ३८, रा. हरेगाव) आणि प्रवाशी महिला गयाबाई चंद्रभान खाजेकर (वय. ७०, रा. हरेगाव) यांना उपचारासाठी नागरीकांनी तातडीने कामगार रुग्णालयात हलविले.

परंतू शिंदे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले. अपघात घडल्यानंतर दुचाकीस्वार दुचाकी घेवून सुसाट वेगात पसार झाला.

याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सीसीटिव्ही कॅमेराच्या आधारे अपघातातील पसार दुचाकीस्वाराचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment