Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingMaharashtraPoliticsSpacial

महाविकास आघाडी सरकार म्हणजे महाराष्ट्रावर आलेले एक मोठे संकट ; माजी पालकमंत्र्यांचा हल्लाबोल

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :- महाविकास आघाडी सरकार म्हणजे महाराष्ट्रावर आलेले एक मोठे संकट असल्यासारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. राज्यातील सध्याचे हे सरकार लवकरच कोसळेल कारण हे सरकार जनतेच्या मनातील सरकार नाही, असं वक्तव्य माजी मंत्री राम शिंदे यांनी केले आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे

या सरकारच्या काळात कोरोनाची आपत्ती आली, अतिवृष्टी झाली, शेतकरी अडचणीत आला. सध्या पाणी आहे तर वीज नाही, डीपी जळत आहेत, कुठलाही दूर दृष्टिकोन नसलेले सरकार असल्याचं राम शिंदे म्हणाले. सरकारकडे कुठलाही विकासाचा मुद्दा नाही. राज्य सरकार दमबाजी आणि दमदाटी करणार असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये झाली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या सत्तेत असल्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेत बदल झालेले दिसतात. यावेळी नेते प्रवीण दरेकरांनी देखील मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली.

दरेकर म्हणाले कि,  मुख्यमंत्रीपदावर बसलेल्या व्यक्तीकडून वार, बघून घेऊ अशा प्रकारची वक्तव्य यापूर्वी कधी झाली नाहीत. मुख्यमंत्र्यांची वक्तव्य चिंताजनक आहेत.

धमकावण्याच्या किंवा सूड घेण्याच्या मानसिकतेत असेल तर ते आता थांबवायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं पाच वर्षाचा कालावधी पूर्ण केला. मराठा आरक्षणाला हायकोर्टात टिकणारे आरक्षण दिले.

सर्व समाजांना न्याय देण्याच्या भूमिका घेतल्या. मराठवाडा वॉटर ग्रीडसारखा प्रकल्प आणला. महाविकास आघाडी सरकारनं याला स्थगिती दिली. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना मदत दिली नसल्याचा आरोप प्रवीण दरेकरांनी केला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button