Best Sellers in Electronics
Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthCorona Virus Marathi News

कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली तसेच मृत्यूचे प्रमाणही, काल झाले ‘इतके’ मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात दिवाळीनंतर कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मृत्यूचे प्रमाण काहीसे वाढले आहे.नगर शहर व जिल्ह्यात गुरुवारी ३३८ नवे पॉझिटिव्ह आढळले. सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

गुरुवारी २६० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५९ हजार ६४३ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६१ टक्के झाले आहे.

उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १८१३ झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ६३, खासगी प्रयोगशाळेत १०८ आणि अँटीजेन चाचणीत १६७ बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयात मनपा हद्दीतील २३, अकोले २, कोपरगाव १, नगर ग्रामीण ६, नेवासे ३, पाथर्डी ४, राहाता १०, राहुरी १, संगमनेर ८, शेवगाव १, श्रीगोंदे १, श्रीरामपूर २, इतर जिल्हा १, खासगी प्रयोगशाळेत मनपा २९, अकोले ८, जामखेड १, कर्जत ६, कोपरगाव ४, नगर ग्रामीण ५, नेवासे ८, पारनेर २,

पाथर्डी ३, राहाता १२, राहुरी ३, संगमनेर १९, शेवगाव ३, श्रीरामपूर ४ आणि कॅन्टोन्मेंट १, तर अँटीजेन चाचणीत मनपा ६, अकोले १९, जामखेड ४, कर्जत ९, कोपरगाव ६, नेवासे २१, पारनेर ५, पाथर्डी १६, राहाता १८, राहुरी ७, संगमनेर २३, शेवगाव ११, श्रीगोंदे ४, श्रीरामपूर १८ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत ९२६ जणांचे बळी गेले आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button