वासन टोयोटात इनोव्हा क्रिस्टाचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते अनावरण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-एमपीव्ही सेगमेंटमध्ये भारतात अव्वल ठरलेली व ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली नवीन इनोव्हा क्रिस्टाचे अनावरण शहरातील केडगाव इंडस्ट्रियल इस्टेट येथील वासन टोयोटा शोरुममध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते थाटात झाले.

यावेळी जनक आहुजा, अनिश आहुजा, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, दिपक जोशी, प्रविण जोशी, रविंद्र थोरात, सावली संस्थेचे नितेश बनसोडे आदी उपस्थित होते. वासन ग्रुपचे चेअरमन विजय वासन यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत शोरुमच्या वतीने केडगावच्या सावली संस्थेत असलेल्या निराधार बालकांसाठी पादत्राणे भेट देण्यात आले.

आमदार जगताप यांच्या हस्ते पादत्राणे सावली संस्थेचे नितेश बनसोडे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. जनक आहुजा म्हणाले की, वासन ग्रुप फक्त व्यवसायासाठी कार्य करीत नसून, सामाजिक बांधिलकी जपून अनेक उपक्रम राबवित असतो. व्यवसायाला सामाजिक बांधिलकीची जोड देत वासन ग्रुपचे कार्य सुरु आहे.

या ग्रुपच्या माध्यमातून अनेक बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तर आमदार संग्राम जगताप यांनी वासन ग्रुपने वंचितांना आधार देण्यासाठी घेतलेला पुढाकार प्रेरणादायी आहे. तर वासन ग्रुपच्या सामाजिक कार्याचे कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

इनोव्हा ही चारचाकी वाहन सर्वच कार प्रेमींना भुरळ घालत आहे. यामध्ये आनखी नवीन बदल करुन इनोव्हा क्रिस्टा ग्राहकांसाठी उपलब्ध झाली आहे. यामध्ये नवीन स्पार्किंग ब्लॅक कलर, नवीन ग्रील आणि बंपर डिझाईन, अलोय व्हिल, ऑडिओ विथ अँड्रॉइड ऑटो/अ‍ॅपल कार प्ले,

फ्रंट क्लिअरन्स सोनार, कॅमलटन इंटीरियर आदी नवीन गोष्टींचा समावेश आहे. नवीन इनोव्हा क्रिस्टा ग्राहकांना टेस्ट ड्राईव्हसाठी नगर-पुणे रोड, केडगाव इंडस्ट्रियल इस्टेट येथील वासन टोयोटा शोरूम मध्ये उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 9604038234 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment