Best Sellers in Electronics
Breaking

अबब! ‘ह्या’ कंपनीच्या मालकाने आपल्या कर्मचाऱ्यांना बनवले करोडपती ; वाटले करोडो …

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :-बॉस म्हटले कि एक ठरलेली प्रतिकृती समोर उभी राहते. परंतु असे नाही की आपण गृहित धरले त्याप्रमाणे सर्व बॉस एकसारखे असतात. अशा बर्‍याच कंपन्या आणि बॉस आहेत जे आपल्या कर्मचार्‍यांच्या हिताचा विचार करतात.

अशीच एक कंपनी आहे द हट ग्रुप. त्याच्या बॉसने कंपनीचा लाभ आपल्या कर्मचार्‍यांना अशा प्रकारे वितरीत केला की सर्व कर्मचारी करोडपती झाले. यात ड्रायव्हरपासून ते शिपाईपर्यंतचा समावेश आहे. जाणून घेऊयात या कंपनीबद्दल आणि बॉसबद्दल .

द हट ग्रुपच्या बॉसचे नाव आहे मॅथ्यू मोल्डिंग ;- ब्रिटनमधील मॅथ्यू मोल्डिंग नावाचे बिझनेसमन आहेत. त्यांनी आपल्या कंपनीचे प्रॉफिट शेयर्स कर्मचार्‍यांमध्ये वाटले आहेत. त्याच्या या निर्णयामुळे कंपनीतील अनेक कर्मचारी करोडपती बनले आहेत, त्यामध्ये ड्रायव्हर आणि शिपाई , वैयक्तिक कर्मचारी यांचा समावेश आहे.

द हट ग्रुप कंपनीने कर्मचार्‍यांना दिले हे प्रॉफिट शेअर्स :- द हट ग्रुप कंपनीने आपल्या कर्मचार्‍यांना प्राफिट शेअर्स देऊन लक्षाधीश केले आहे. ही एक ब्रिटीश कंपनी आहे. याची मालकी मॅथ्यू मोल्डिंगकडे आहे. मॅथ्यू मोल्डिंगने आपल्या कंपनीच्या हितासाठी आपल्या कर्मचार्‍यांना 8183 कोटी रुपयांचे शेअर्स दिले आहेत. कंपनीने कर्मचार्‍यांसाठी बाय बॅक योजना चालविली. यात मॅथ्यू मोल्डिंगने सर्व कर्मचार्‍यांना सामील होण्याची संधी दिली.

मॅथ्यू मोल्डिंगमुळे आता कर्मचारी करोडपती:-  मॅथ्यू मोल्डिंगच्या निर्णयाचा फायदा कंपनीच्या ड्रायव्हरपासून असिस्टेंट पर्यंत झाला आहे. मॅथ्यूच्या पर्सनल असिस्टेंटच्या म्हणण्यानुसार, तिला इतके पैसे मिळाले आहेत की वयाच्या 36 व्या वर्षी ती निवृत्त होऊ शकते. मॅथ्यू मोल्डिंगच्या म्हणण्यानुसार, प्रत्येकजण या व्यवसायाबद्दल काही ना काही मत देत होता. वेळ कठीण होता, परंतु आम्हाला खात्री होती की कंपनीचा शेअर वाढेल. आणि आता कंपनीला फायदा होत असल्याने तो कर्मचार्‍यांमध्ये वाटला गेला आहे.

या कंपनीबद्दल जाणून घ्या :- द हट ग्रुप ब्रिटेनचा ई-कॉमर्स व्यवसाय करणारी कंपनी आहे. जिम चे शौकीन 48 वर्षीय मोल्डिंगत्यांच्या जबरदस्त पार्ट्या, त्याचे प्रोटीन शेक आणि त्याच्या ब्रँडच्या सौंदर्य उत्पादनांसाठी चर्चेत असतात . 2004 मध्ये जॉन गॅलमोर यांच्यासमवेत त्यांनी द हट समूहची स्थापना केली. द हट ग्रुप जगभरातील 164 देशांमध्ये व्यवसाय करतो. यावर्षी सप्टेंबरमध्ये मॅथ्यू मोल्डिंगने प्रथमच फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button