अहमदनगर ब्रेकिंग : पैशाच्या वादातून एका तरुणाचा खून

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- शिर्डी जवळील डो-हाळे गावामध्ये पैशाच्या घेण्यावरून एका तरुणाचा खून झाला आहे. या घटनेने शिर्डी डो-हाळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.27 नोव्हेंबर) रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान येथे घडली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, राहाता तालुक्यातील शिर्डी नजीक असणारे डोराळे या गावात एका तरुणाचा पैशाच्या घेण्यावरून खून करण्यात आला आहे.

या घटनेबाबत प्रवीण माधव धारे( वय 25 रा. जवळके) यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून, फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की,

आरोपी चांगदेव पूजा डांगे, शंकर चांगदेव डांगे, अमोल चांगदेव डांगे रा,डोराळे यांनी हा खून केला आहे. शुक्रवार (दि.27) रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान योगेश सोपान दंवगे (वय 28 रा. पाथरे वारेगाव ता. सिन्नर) व फिर्यादी प्रवीण महादेव धारे या दोघांना शिवा रहाणे यांच्याकडून पैसे घेतले व ते घेण्यासाठी या तिघांनी या पैशाच्या देवाण घेवाणवरून प्रवीण महादेव धारे व योगेश सोपान दवंगे यांना शिवीगाळ करत धरुन हातातील धारदार शस्त्राने वार केले.

आरोपी चांगदेव पूजा डांगे, शंकर चांगदेव डांगे, अमोल चांगदेव डांगे यांनी योगेश सोपान दवंगे याला पकडून यांच्यावर धारदार शस्त्राने पोटावर, छातीवर वार केल्याने गंभीर जखमी करून त्याचा खून केला आहे.

या घटनेमुळे शिर्डी डोराळे परिसरात मात्र खळबळ उडाली आहे,चांगदेव डांगे ,शंकर डांगे, अमोल डांगे राहणार डोराळे यांच्यावर शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्ट्रेशन 755 / 2020भादवि कलम 302/ 307/ 504// 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment