Best Sellers in Electronics
BreakingMaharashtraPolitics

राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती शहर जिल्हा उपाध्यक्षपदी सुजाता दिवटे यांची नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती शहर जिल्हा उपाध्यक्षपदी सुजाता दिवटे यांची नियुक्ती करण्यात आली. आमदार संग्राम जगताप व राष्ट्रवादी महिला शहर जिल्हाध्यक्ष रेशमा आठरे यांच्या हस्ते दिवटे यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, युवती अध्यक्ष अंजली आव्हाड, ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, विद्यार्थी सेलचे अध्यक्ष वैभव ढाकणे, माजी नगरसेवक संभाजी पवार, संघटक राजेश भालेराव, फुले बिग्रेडचे दिपक खेडकर, शेखर राठीया, युवकचे तन्वीर मणियार उपस्थिती होते.

आमदार संग्राम जगताप म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षात युवतींना मानाचे स्थान असून, प्रमुख पदांसह विविध महत्त्वाची जबाबदारी युवती व महिलांवर सोपविण्यात आली आहे. खा. सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून संपुर्ण महाराष्ट्रात युवती सक्षम व निर्भय होण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात आले.

महिला राजकारणात देखील आपले कर्तुत्व सिध्द करीत आहे. युवतींनी प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्हावे, याच भावनेने जिल्ह्यातील महिला व युवती पदाधिकार्‍यांना संधी दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. माणिक विधाते यांनी युवतीच्या नुतन पदाधिकारीस पुढील वाटचालीस शुभेच्छा देत युवतींच्या प्रश्‍नावर कार्य करण्याचे आवाहन केले.

सत्काराला उत्तर देताना युवतीच्या नवनिर्वाचित शहर जिल्हा उपाध्यक्षा सुजाता दिवटे यांनी युवतींचे सर्व प्रश्‍न सोडविण्यासाठी कटिबध्द राहणार असून, यासाठी शहरातील युवतींना संघटीत करण्याचा संकल्प व्यक्त केला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button