तिच्याशी लग्न लावून दिले नाही तर आख्खे नगर पेटवून देईल…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- आमच्याकडे टिकली लावलेली व लिपस्टीक लावलेली चालत नाही, असे म्हणून व त्यावरून भांडणे करून तसेच लग्न व धर्म परिवर्तनासाठी बळजबरी केल्याने अल्पवयीने युवतीने आत्महत्या करण्याची घटना नगरमध्ये घडली.

पोलिसांनी याप्रकरणी पुणे येथील सोहेल शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संबंधित युवतीच्या आईने पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे.

त्यांची दहावीत शिकणारी मुलगी पुण्याला मामाकडे गेली असता मामाच्या विवाहित मुलीकडे गेली होती व तेथे तिची सोहेलशी ओळख झाली.

तिच्याशी लग्न लावून दिले नाही तर आख्खे नगर पेटवून देईल, अशी धमकी त्याने मुलीच्या वडीलांना फोनवरून दिली होती. तसेच मुलीच्या मावस बहिणीच्या लग्नात मावसभावाने काढलेले फोटो सोशल मिडियात टाकल्याने त्यालाही व मुलीलाही त्याने शिवीगाळ केली होती.

तो त्रास देत असल्याची तक्रार या मुलीने कुटुंबातील काही सदस्यांकडे केली होती व या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या आईने पोलिसात दिली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment