या पर्यटन स्थळावरील हॉटेलवर विनविभागाची धडक कारवाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- कोरोना लाॅकडाऊनची बंधने थोडी शिथिल होताच पुणे, मुंबई आणि नाशिक येथील पर्यटकांची व गिर्यारोहकांची गर्दी अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगडावर वाढली आहे.

त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती लक्षात घेऊन गावातील एका गटाने वन विभागाकडे तक्रार करून गडावरील पर्यटन थांबवण्याची विनंती केली.

त्याची गंभीर दखल घेत वन विभागाने गिरीभ्रमण करणाऱ्यांचे आकर्षण असलेल्या हरिश्चंद्रगडावर थाटण्यात आलेल्या झोपडीवज हॉटेलवर कारवाई केली.

जंगलातील लाकूड वापरून हॉटेल बांधले, असे कारण पुढे देत नव्याने गडावर बांधलेली हॉटेल्सची अतिक्रमणे काढून टाकण्यात आली. गडावर येणाऱ्या पर्यटकांची सोय हे हॉटेलचालक करतात.

जितक्या सोयी, तितकी गर्दी वाढत जाते. हाॅटेलांचे बांधकाम काढल्याने ते बंद पडून पर्यटक येणार नाहीत, असे गृहित धरून वन विभागाने ही कारवाई केल्याचे समजते.

तथापि, अनेक पर्यटक गडावर येताना आवश्यक खाद्यपदार्थ व शिधा घेऊन येतात. त्यामुळे पर्यटकांना कसे रोखणार हा प्रश्नच आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment