Best Sellers in Electronics
MaharashtraPolitics

त्या अनुभवानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पहाटे कोणतीच गोष्ट करत नसतील

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :- पुणे मतदारसंघात बोगस मतदारांची नोंदणी झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने याची चौकशी करावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली. पदवीधर मतदारसंघाच्या याद्या उशिरा जाहीर झाल्या.

यामध्ये दुबार नावे, एकच मोबाईल नंबर, चुकीचे पत्ते, अशा अनेक त्रुटी आहेत. या मतदारांपर्यंत प्रचारयंत्रणा पोहोचू नये, म्हणून कोणीतरी असे केले आहे. याविरोधात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. आम्ही फडणवीसांना टरबुज्या म्हणत नाही, चंपा म्हटल्यावर चंद्रकांत पाटलांनी राग मानू नये.

देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादी कधी टरबुज्या म्हणत नाही. चंद्रकांतदादांच्या नावाचा शॉर्टफॉर्म चंपा आहे. त्यांनी राग मानून घेऊ नये, असा टिपणी जयंत पाटलांनी केली. अशाप्रकारे कोणाचाही अपमान करण्याला राष्ट्रवादी काँग्रेस समर्थन देत नाही. शरद पवार यांनी आम्हाला अशा गोष्टी शिकवल्या नाहीत.

राज्यात गेल्यावर्षी अजित पवार यांना हाताशी धरुन भाजपकडून करण्यात आलेल्या सत्तास्थापनेच्या अयशस्वी प्रयोगाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी महाविकासघाडीतील नेत्यांनी शपथविधीच्या आठवणींना उजाळा देत एकप्रकारे भाजपच्या जखमेवर मीठ चोळले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनीही पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत मिश्किल टिप्पणी केली. त्या अनुभवानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आता पहाटे कोणतीच गोष्ट करत नसतील, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी लगावला. राजकारणात अशा गोष्टी घडत असतात.

मात्र, आता त्या कटू आठवणी काढण्यात अर्थ नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले. तसेच महाराष्ट्राला आता भाजपची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रवीण दरेकर यांनी पदवधीर मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सत्तांतर होण्याचा दावा केला. बरं झालं ते पदवीधर निवडणुकीनंतर सत्तांतर होईल, असे बोलले. निवडणुकीआधी होईल, असे बोलले नाहीत. मात्र, आता राज्याला भाजपची गरज नसल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button