या तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढतेय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :- शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. गावपातळीवर कोरोनाचे संक्रमण वाढले असल्याने कोरोनाबाधितांची आकडेवारीत वाढ होत आहे.

त्यातच जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कोरोना सुसाट सुरु आहे. अकोले तालुक्यात कोरोनाचा कहर काही थांबायचे नाव घेत नाही. तर लोक देखील काही जबाबदारीने वागायला तयार नाहीत.

त्यामुळे, येथील कोरोनाची आकडेवारी मोठी वाढती दिसते आहे. अकोले तालुक्यात आज १२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण बाधितांची संख्या २९३२ इतकी झाली आहे.

आज तालुक्यात ८२ चाचण्या घेण्यात आल्या यामध्ये आठ जण बाधित आढळून आले आहेत. तर खासगी अहवालात चार जण बाधित आढळून आले आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment