कोण आहेत रेखा जरे पाटील ? वाचा त्यांच्याविषयी माहिती…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :- यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांची गळा चिरून हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

यशस्विनी महिला ब्रिगेड ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्थापन करण्यात आलेली संघटना आहे. रेखा जरे पाटील या संघटनेचं नेतृत्व करत होत्या. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही रेखा जरे सक्रिय होत्या.नगर जिल्ह्यात महिलांच्या सबलीकरणासाठी विविध स्तुत्य उपक्रम या संघटनेच्या माध्यमातून त्या राबवत होत्या. 

महिलांच्या विविध प्रश्नांची तड लावण्यासाठी वेळोवेळी या संघटनेने आक्रमक भूमिका घेतली. महिलांवरील अन्यायाविरुद्धही आंदोलने करण्यात आली. 

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment