Best Sellers in Electronics
Ahmednagar NewsAhmednagar NorthCrime

उसाच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :- सध्या नगर जिल्ह्यात गुन्हेगारी सुसाट सुटली आहे. चोऱ्यांचे सत्र सुरु असताना आता खून दरोडे आदी घटनांमुळे नगर जिल्ह्याची प्रतिमा मालिन होऊ लागली आहे. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

नुकतेच जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील वाकडी येथे अस्तगाव नांदूर रोडलगत ऊसाच्या शेतात अज्ञात पुरुष जातीचा बेवरस कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. सदर मृतदेह त्याच्या अंगावर काळा कलर चा टी-शर्ट व खाक्या कलरची पॅन्ट आहे ही आत्महत्या की हत्या याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

या मृतदेहाचे वय साधारण 35 ते 40 आहे अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.या घटनेची माहिती सरपंच डॉक्टर संपतराव शेळके व पोलीस पाटील अभंग यांना माहिती देण्यात आली. श्रीरामपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मसूद खान यांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.

घटनेच्या ठिकाणी श्वानपथक बोलविण्यात आली होती कुजलेल्या मृतदेह असल्यामुळे शवविच्छेदन करणे अवघड होते जागेवरच डॉक्टरांचे पथक बोलून शवविच्छेदन करण्यात आले . याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक मसूद खान यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल आडगंळे करत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button