देह व्यापारातील बळी महिलांना आरोग्याच्या विविध योजनांचा लाभ देण्यास जिल्हारुग्णालय कटिबद्ध– डॉ.अरुण सोनवणे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2020 :- देह व्यापारातील बळी महिलांना शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ देण्यास जिल्हा रुग्णालय कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन जिल्हा रुग्णालयाचे हिपँटायटीस बी तपासणी मोहिमेचे समन्वयक डॉ. अरुण सोनवणे यांनी केले. जागतिक एच. आय. व्ही./एडस सप्ताहनिम्मित स्नेहालय, लायन्स क्लब अहमदनगर, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय आणि महालँब अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने देह व्यापारातील बळी महिलांसाठी ‘वीर रणरागिणी’ महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात मा.डॉ. सोनवणे बोलत होते. ते म्हणाले की, देह व्यापारातील बळी महिलांना विविध आरोग्याच्या योजना मिळवून देण्यास जिल्हा रुग्णालय स्नेहालय सोबत काम करेल. यावेळी व्यासपीठावर मा. प्रवीण मुत्याल (सदस्य, बाल कल्याण समिती, अहमदनगर) डॉ. अमित बडवे (अध्यक्ष, लायन्स क्लब, अहमदनगर) मा. सुधीरजी लांडगे (सचिव, लायन्स क्लब, अहमदनगर), डॉ. विक्रम पानसंबळ (वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, ए.आर.टी. विभाग, जिल्हा रुग्णालय, अहमदनगर), मा. शिवाजी जाधव (जिल्हा कार्यक्रम अधिकारी, डापकु विभाग, जिल्हा रुग्णालय, अहमदनगर),

मा. राहुल कडूस (समुपदेशक, आय.सी.टी.सी. विभाग), डॉ. सोनाली बोरा (वैद्यकीय अधिकारी, स्नेह्ज्योत प्रकल्प) आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय व्हायरल हिपँटायटीस नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत हिपँटायटीस बी आणि हिपँटायटीस सी निशुल्क तपासणी/चाचणी शिबिराचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी २५० पेक्षा अधिक महिलांनी हिपँटायटीस बी आणि हिपँटायटीस सी ची तपासणी करून घेतली.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकतेत मा. दिपक बुरम म्हणाले की, जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत विविध आरोग्याच्या योजना, दुर्धर आजाराचे प्रमाणपत्र व ए.आर.टी.चे औषधे घरपोहोच मिळावे या हेतूने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध शासकीय योजना, घरकुल योजना मिळविण्यासाठी देह व्यापारातील बळी महिला यांची संख्या, नाव,पत्ता आदी माहिती घेऊन प्रशासनामार्फात अडी अडचणी सोडविण्याचा प्रयत्न स्नेहालय करणार आहे. शासनाच्या विविध योजनांसाठी विविध कागदपत्रांची मागणी केली जाते.

ती कागदपत्रे महिलांकडे नसल्यामुळे त्यांना शासकीय तसेच आरोग्य योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे महिलाच्या मदतीचे निकष बदलले जावेत, असेत्यांनी नमूद केले. मा. शिवाजी जाधव म्हणाले की, देह व्यापारातील महिलांनी आपल्या आयुष्याची झालेली ससेहोलपट विसरून नव्याने जीवन जगणे आवश्यक आहे. आज देशातील अनेक महिलांनी देह व्यापार सोडून नवीन कौश्यले अंगिकारली आहेत. उत्तम प्रकारचे रोजगार ते आज मिळवीत आहेत. आपण प्रत्येक वेळेस इतरांकडे बोट न दाखविता व्यसनाधीनते पासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रत्यत्न करणे गरजेचे आहे.

डॉ. अमित बडवे म्हणाले की, महिलांनी बचतीची सवय लावावी. बचतीची कास धरली तर आर्थिक विकासहोण्यास मदत होईल. मा. सुधीरजी लांडगे यांनी भविष्यात लायन्स क्लबच्या माध्यमातून रोजगाराच्या दृष्टीने नवीन प्रकल्प उभारण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आकाश काळे, फिरोज पठाण, प्रवीण बुरम, संजय जिंदम, मझहर खान, मीना पाठक, सविता करंडे, आशा जाधव, आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी माने यांनी केले तर उपस्थितांचे आभार अशोक चिंधे यांनी मानले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment