27 ग्रामपंचायतींसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2020 :- राज्यात निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. नुकतेच कोरोनाच्या काळात पदवीधर निवडणुकीसाठी आज मतदान झाले. निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून याचबरोबर राजकीय पुढाऱ्यांसह कार्यकर्ते देखील जोमाने निवडणुकीच्या कामात पुढाकार घेत आहे.

यातच श्रीरामपूर तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार श्रीरामपूर तालुक्यातील माहे जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणार्‍या तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा मतदार यादी कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

तालुक्यातील गळनिंब, वडाळा महादेव, घुमनदेव, टाकळीभान, ब्राह्मणगाव वेताळ, बेलापूर बु. निपाणी वडगाव, कुरणपूर, कारेगाव, बेलापूर खु., पढेगाव, सराला, गोंडेगाव, मातुलठाण, भेर्डापूर, गोवर्धनपूर, मालुंजा बु., खोकर, महांकाळ वडगाव, नायगाव, मुठेवडगाव, वळदगाव, मांडवे, खानापूर, लाडगाव,

एकलहरे व मातापूर या 27 ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 1 डिसेंबर, 2020 रोजी सर्व तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, पंचायत समिती कार्यालय व तहसिल कार्यालय येथील सूचना फलकांवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीसंदर्भात हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी 1 ते 7 डिसेंबर, 2020 असून 10 डिसेंबर, 2020 रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या 27 ग्रामपंचायतींमध्ये एकूण 102 प्रभाग असून 281 सदस्य निवडून द्यायचे आहेत. यात 154 जागा महिला सदस्यांसाठी आरक्षित आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment