Ahmednagar CityAhmednagar NewsBreakingCorona Virus Marathi NewsPolitics
ब्रेकिंग न्युज : एकाच पक्षातील कायकर्त्यांमध्ये राडा. सॅनिटायझरच्या स्टँडने हाणामारी! कारच्या काचा फोडल्या..

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :- अहमदनगर शहरातल्या एका राष्ट्रीय पक्षाच्या जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्याच पक्षाच्या युवक शहर जिल्हाध्यक्षाला पक्ष कार्यालयातच सॅनिटायझरच्या स्टँडने मारहाण केल्याची घटना नुकतीच घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या पक्षाच्या युवा नेत्याबरोबर फोटो काढण्यावरुन ही हाणामारी झाल्याचं सांगितलं जातंय.दरम्यान, याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात एन. सी. अर्थात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved