आठ महिन्यांपासून कोरोनाची भीती आता त्यात बिबट्यांची भर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :-आठ महिन्यांपासून कोरोना संसर्गाची भीती सर्वांना वाटत होती. आता त्यात बिबट्यांची भर पडली आहे. बाहेर पडले की कोरोनाची आणि शेतात गेले की, बिबट्यांची दहशत शेतकऱ्यांना वाटते.

शेतीसाठी रात्रीच वीज पुरवठा केला जात असल्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी रात्री जावे लागते. महावितरणने दिवसा वीज दिली, तर बिबट्यांच्या तावडीत सापडण्याची वेळ आमच्यावर येणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. नेवासे तालुक्यात बिबट्यांचा धुमाकूळ मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

दिवसा ढवळ्या बिबटे फिरताना दिसतात. चांदा, रस्तापूर, कौठा, देडगाव व अन्य भागात बिबट्यांची संख्या जास्त आहे. बिबट्यांच्या दहशतीमुळे शेतातील कामे रखडली आहेत. महावितरण कंपनी रात्री ११.४० ते ९.४० या वेळात कृषिपंपांसाठी वीज पुरवठा करते.

पाणी धरण्यासाठी घरापासून २/३ किलोमीटर अंतरावर रात्री कसे जावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शासनाने शेतीसाठी दिवसा वीज देण्याची घोषणा केली, पण ही घोषणा प्रत्यक्षात कधी येणार, अशी विचारणा शेतकरी वर्गातून होत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment