थकीत कर्जदारांना लाखोंचे कर्ज वाटले; २७ संचालकांवर गुन्हा दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील वेळू विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित या संस्थेमध्ये संचालकांनी सचिवास हातास धरून थकीत कर्जदारांना कर्ज वाटप करून लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी फिर्यादी सुनील खर्डे (विशेष लेखा परीक्षण अधिकारी) यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात अपहार केल्याप्रकरणी फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील वेळू येथील विविध कार्यकारी सेवा संस्थेमध्ये ०१ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीचे संस्थेचे फेर लेखा परीक्षण करून त्याचा अहवाल सहाय्यक निबंधक यांच्याकडे सादर करण्याचे आदेश झाल्यानंतर हे लेखा परीक्षण करण्यासाठी सुनील नामदेव खर्डे विशेष लेखा परीक्षण वर्ग २ नेमणूक संगमनेर यांची निवड करण्यात आली होती.

त्यानुसार त्यांनी ३१ डिसेंबर २०१९ मध्ये संस्थेचे लेखा परीक्षण पूर्ण केले. त्यानुसार संस्था व्यवस्थापन २०१०-२०१५ या कालावधीमध्ये संस्थेचे संचालक म्हणून चेअरमन संजय प्रेमराज आगविले, वसंत यशवंत औटी (मयत), रामदास नामदेव हराळ रा. श्रीगोंदा, जगन्नाथ विठोबा डेबरे रा. वेळू, बन्सी बाबुराव पाचारणे, राजू धोंडीबा सांगळे, गणेश माधव येडे, नागनाथ राजाराम पिंपळे, सुलोचना माधव पिंपळे,

पोपट निवृत्ती चिखलठाणे (सहाय्यक सचिव), मारुती विष्णू अनभुले (मयत सचिव), तसेच २०१५-२० याकालावधीमध्ये संचालक मंडळात नितीन वसंत औटी (चेअरमन), मारुती एकनाथ देवखिळे, नवनाथ एकनाथ वडवकर, शिवाजी गंगाराम पिंपळे, रावसाहेब मोहन येडे, पंडित विनायक पाटील, लक्ष्मण यादव देवखिळे, विजय रामाराव चोर, दिलीप धोंडीबा सांगळे, बन्सी बाबुराव पाचारणे, अलका दिलीप डेबरे, लता पांडुरंग वडवकर, सुनिता संदीप पायमोडे, पोपट निवृत्ती चिखलठाणे (सहाय्यक सचिव) मारुती विष्णू अनभुले (मयत सचिव) यांनी संचालक म्हणून काम पाहिले त्याचा लेखा परीक्षण अहवाल लेखा परीक्षक सुनील खर्डे यांनी तयार केला असून.

त्यामध्ये १ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीमध्ये संस्थेचे सन २०१० ते २० मध्ये चेअरमन, व्हा. चेअरमन, सचिव, संचालक यांनी अफरातफर करून जिल्हा सहकारी बँक शाखा श्रीगोंदा येथील बँक इन्स्पेक्टर शिवाजी छगन मोटे यांनी थकीत कर्जदार यांचे पहिले थकीत कर्जदार असल्याचे माहित असूनही त्याची पूर्ण वसुली न करता त्यांना दुबार कर्ज मंजूर करून संस्थेचे संचालक मंडळ, सचिव सहाय्यक सचिव यांनी संगनमताने सुमारे सात लाख सदोतीस हजार पंचावन्न रुपये थकीत कर्जदारांकडून वसूल केले. मात्र कोणत्याही हिशोबात घेतलेले नाही.

तसेच एक लाख पंचाहत्तर हजार रुपये वाटप केलेलं कर्ज अमान्य ७, २७, ९६२/- मध्ये प्रथम कर्ज थकीत असून त्यातील १२ ते २६ कर्जदारांचे कर्ज नष्ट केले. तसेच ४८३७/- रुपये दुबार व २४००००/- विना व्हाऊचर संचालकाची मंजुरी न घेता मेहनताना रक्कम काढली आहे. तसेच अशी मिळून एकूण रक्कम १६,६८,८५४/- रुपये या रक्कमेचा अपहार केल्याप्रकरणी फिर्यादी सुनील नामदेव खर्डे यांच्या फिर्यादीनुसार २७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजनकर हे करत आहेत .

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment