Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingCorona Virus Marathi News

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : कोरोनामुळे चाैघांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-कोरोनामुळे बुधवारी जिल्ह्यातील चाैघांचा मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या ९३८ झाली. दिवसभरात नवे २१९ पॉझिटिव्ह आढळून आले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०८ टक्के आहे.

२४ तासांत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २३, खासगी प्रयोगशाळेत ९२ आणि अँटीजेन चाचणीत १०४ बाधित आढळले. आतापर्यंत ६३ हजार ८९१ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ६१ हजार ३८९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

नव्या रुग्णांमध्ये मनपा हद्दीतील ११, कर्जत १, नगर ग्रामीण ४, नेवासे १, पारनेर ४, श्रीगोंदे १, मिलिटरी हॉस्पिटल १ रुग्णाचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत मनपा २३, अकोले ३, कर्जत २, कोपरगाव १६, नेवासे ३, पारनेर ५, पाथर्डी ३, राहाता १०, राहुरी ५, संगमनेर १३, शेवगाव २, श्रीरामपूर ६, कँटोन्मेंट १ रुग्णाचा समावेश आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button