स्टेट बँकेच्या ग्राहकांना अलर्ट ; ‘ह्या’ मध्ये झालीये मोठी गडबड, वाचा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :- सर्वात मोठी बँक एसबीआयचे योनो ऍप वापरणाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आहे. वास्तविक, आज 2 डिसेंबर रोजी ग्राहकांना एसबीआयच्या योनो अ‍ॅप वापरण्यात अडचणी येत आहेत. बँकेचे ऑनलाईन व्यवहार बिघडत असल्याची तक्रार एसबीआयच्या अनेक ग्राहकांनी केल्या आहेत. काही ग्राहकांचे म्हणणे आहे की ते एसबीआयच्या योनो ऍपवर लॉग इन करू शकत नाहीत. लॉग इन केल्यावर त्यांना स्क्रीनवर Error हा संदेश दिसतो.

केव्हापासून समस्या आहे ?

इंडिया टुडेच्या अहवालानुसार मंगळवार 1 डिसेंबरपासून बँक ग्राहकांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मंगळवारपासून याबाबत तक्रार करण्यास सुरवात केली. परंतु अजूनही ग्राहकांना अशाच समस्या भेडसावत आहेत.

बँक ग्राहकही ऑनलाइन पैसे पाठविण्यास असमर्थ आहेत. अन्य बॅंकांच्या ग्राहकांनाही एसबीआय बँकेच्या ग्राहकांना ऑनलाईन पैसे पाठविण्यात अडचण येत आहे. बँकेने अद्याप या संदर्भात कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.

स्क्रीनवर येतोय कोड

एसबीआयच्या अनेक ग्राहकांनी तक्रार केली आहे की बँकेचा मोबाइल एप्लिकेशन, योनो, ‘एम005’ अशा पद्धतीचा एक एरर कोड दर्शवित आहे आणि ऑनलाईन व्यवहार करण्यास अक्षम आहे. 22 नोव्हेंबर रोजी बँकेसमोर तांत्रिक अडचण निर्माण झाली होती, त्यामुळे ऑनलाईन व्यवहार शक्य नव्हते.

त्यानंतर एसबीआयने गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली. एसबीआयने सर्व्हर कनेक्टिव्हिटी कमी होण्याबाबत आणि समस्या लवकरात लवकर सोडविण्याविषयी बोलले होते. बँकेने अन्य डिजिटल चॅनेल वापरण्याची सूचना केली होती.

योनो अ‍ॅप काय आहे ?

योनो अ‍ॅप एसबीआयचे डिजिटल बँकिंग अ‍ॅप आहे, जो 24 नोव्हेंबर 2017 रोजी लाँच झाला होता. योनो बँकिंग, लाइफस्टाइल, विमा, गुंतवणूक आणि खरेदीच्या गरजांसाठी वन-स्टॉप सॉल्यूशन आहे. या अ‍ॅपच्या वापरकर्त्यांची संख्या कोटींवर पोहोचली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment