कृषी विधयेकाविरोधात महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात आंदोलन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-  गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने कृषी विधेयक मंजूर केले आहे. मात्र त्यानंतर देशात संतापाची लाट उसळली. काही शेतकरी संघटनांसह विरोधकांनी या कृषी विधेयकाला जोरदार विरोध दर्शविला.

या विधेयकाच्या निषेधार्थ आंदोलने करण्यात आली. कृषी विधेयक मागे घेण्यासाठी दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला कॉँग्रेसच्यावतीने पाठिंबा जाहिर करण्यात आला. केंद्र सरकारने मंजूर केलेले नवे कृषी व कामगार विधेयक मागे घ्यावे.

अशी मागणी कॉँग्रेसच्यावतीने करत आज गुरूवारी (दि.०३) सकाळी संगमनेर शहरातील नवीन नगर रस्ता येथे आंदोलन सुरू केले आहे. दिल्ली येथे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे आंदोलन चालू आहे. त्याला पाठींबा देण्यासाठी संगमनेर मध्ये हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नगराध्यक्षा दुर्गा तांबे, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ,

पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ आरगडे, उपनगराध्यक्ष राजेंद्र सांगळे, नगरसेवक हिरालाल पगडाल, शेतकरी नेते अरूण कान्होरे , अहमदनगर जिल्हा युवक कॉँग्रेसच्या उत्तर विभागाचे कार्याध्यक्ष अभियंता सुभाष सांगळे आदी सहभागी झाले आहेत.

केंद्रसरकारने मंजूर केलेले हे कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. याला विरोध म्हणून हे आंदोलन करण्यात आले असल्याची प्रतिक्रया आंदोलनकर्त्यांनी दिल आहे. हे विधेयक लागू करण्यात येऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलने देखील केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment