कोरोना चाचणी झाली आणखी स्वस्त !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-जगावर गेल्या अनेक महिन्यांपासून घोंगावणारे कोरोनाचे संकट अद्यापही कायम आहे. मात्र यातच एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.

दिल्ली, उत्तर प्रदेश आणि गुजरातनंतर ओडिशानेही कोरोना चाचणीच्या किंमतीत कपात केली आहे. ओडिशामध्ये कोविड चाचणी फक्त 400 रुपयांमध्ये होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

विविध राज्यांमध्ये कोरोना चाचणीच्या दरांमध्ये कपात करण्यात आली आहे. जणू राज्य सरकारमध्ये कोरोना चाचणींचे दर स्वस्त करण्याची एकप्रकारे शर्यतच लागली आहे. कोविड चाचणी आतापर्यंत दोन हजार ते 2400 रुपयांच्या किंमती होती. दिल्ली सरकारनं मात्र खासगी रुग्णालयातील कोविड चाचणीचा दर 800 रुपये केला आहे.

दिल्लीनंतर राजस्थान आणि गुजरात सरकारनेही खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणीचे दर कपात करण्याची घोषणा केली. मंगळवारी उत्तरप्रदेश सरकारनं आरटी-पीसीआर चाचणीचे दर कपात करत 700 रुपये करण्यात आलं आहे.

त्यानंतर आता ओडिशामध्ये कोरोनाच्या आरटी-पीसीआर चाचणीला फक्त 400 रुपये मोजावे लागतील. दरम्यान ओडिशा सरकारनं राज्यातील सर्व खासगी लॅबधारकांना सूटना नोटीस पाठवण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment