हिवरे बाजारच्या नातीचा गौरव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :- नगर–कु.सह्याद्री अर्जुन गायकवाड हिने इयता आठवी स्कॉलरशिप परीक्षेत राज्यात द्वीतीय क्रमांक मिळविला असून अहमदनगर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे यापूर्वी तिने इयता पाचवी स्कॉलरशिप मध्ये राज्यात अकरावा क्रमांक मिळविला आहे

तसेच चित्रकला इलीमेंटरी परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत क्रमांक मिळविला होता त्याचबरोबर गणित प्राविण्य परीक्षेत यश संपादन केले.त्याबद्दल हिवरे बाजार परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.

सह्याद्री अर्जुन गायकवाड ही हिवरे बाजार येथील सरपंच पद्मश्री पोपटराव पवार तसेच हिवरे बाजार येथील प्राथमिक शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री.सदाशिव पवार यांची नात तसेच चास येथील अर्जुन कुशाबा गायकवाड यांची मुलगी आहे.

ती अहमदनगर येथील रेसिडेन्शिअल हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. सत्कारप्रसंगी समवेत श्री.एम.डी.झावरे उपअभियंता सा.बा.नगर जि.प.,सी.एन.खाडे विस्तार अधिकारी पंचायत समिती नगर,सदाशिव पवार गुरुजी, एस.टी.पादीर ,सुजाता गायकवाड व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment