Best Sellers in Electronics
Ahmednagar NewsAhmednagar North

ग्रामपंचायत निवडणूक तयारीची ससाणेंनी केली मुरकुटेंच्या बालेकिल्ल्यातून सुरुवात

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-आगामी ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तालुक्यात वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून, पुढील रणनिती ठरविण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी कंबर कसली असताना नेत्यांनी देखील त्याची सुरुवात केली असून तालुका काँग्रेसच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्काराचे निमित्त साधून

येथील श्रीरामपूर तालुका अप्लसंख्यांक तालुकाध्यक्ष नाना मांजरे यांच्या निवासस्थानी नूतन पदधकाऱ्यांच्या सत्कार प्रसंगी उपनगराध्यक्ष करण ससाणे व काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या.

ससाणे व गुजर यांच्या हस्ते अप्लसंख्यांक तालुकाध्यक्ष नाना मांजरे, तालुका काँगेस कमिटीचे उपाध्यक्ष पाराजी गायधने व निपाणी वाडगाव पंचायत समिती गणाचे काँग्रेस पक्षाचे समन्वक प्रशांत राऊत यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी कार्यकर्त्यांनी आपल्या समस्या मांडल्या.

यावेळी मार्गदर्शन करताना करण ससाणे म्हणाले की, स्थानिक पातळीवरील सर्व समस्या सोडविल्या जातील. जोशी वस्ती परिसरातील नागरिकांनी आपल्या समस्या मांडताना गावात आमदार निधीतून होणाऱ्या कामाचे ठिकाण बदलून तो निधी जोशी वस्ती परिसरात वापरण्याची मागणी केली असता

त्याबाबत आमदार कानडे यांच्याशी संपर्क साधून त्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले तसेच जोशी वस्ती परिसरामध्ये पाटाच्या पक्क्या पुलाच्या कामाबाबत लक्ष घातले जाईल असे आश्वासन दिले. गावातील ससाणे गटाने यापूर्वी दोन वेळेस मुरकुटेंच्या बाले किल्ल्यात सत्ता मिळविलेली असून यावेळी देखील चांगले वातावरण तयार झाले असून

कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर सकारात्मक विचार करून कामे करून जनतेचा विश्वास संपादन केल्यास ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर अटळ आहे असे शेवटी ससाणे म्हणाले. आ. लहू कानडे, करण ससाणे, सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेच्या समस्या सोडविल्या जातील असे नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले,

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पापभाई शेख होते. यावेळी मा. उपसरपंच सर्जेराव देवकर, सुनील घोरपडे, संभाजी देवकर, मा. उपसरपंच बाळासाहेब गायधने, मा. सरपंच अशोक भालेराव, नवशिराम एकनर, चांगदेव गोराणे, सूर्यभान गायधने, बंडू उंडे, विठ्ठल सोनवणे,

राजेंद्र राऊत, मिलिंद इनामके, आबा गायधने, गणेश गायधने, भागचंद राऊत, राजेंद्र पवार, राजेंद्र देवकर, भैया कुरेशी, बाबन शेख, रऊफ भाई सय्यद, अकील पठाण, नितीन जाधव, आनंदा साळवे, बाजीराव गोर्डे, आयुब पठाण, नाथा मांजरे, दौलत मोरे, सचिन दासरजोगी, रवींद्र जाधव आदी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button