गांजाला ‘ड्रग्स’ नव्हे तर ‘औषध’ म्हणून मिळाली मान्यता !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्राच्या अंमलीपदार्थ आयोगाने नुकताच हा निर्णय घेतला आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आलेल्या शिफारशीनंतर संयुक्त राष्ट्राच्या अंमलीपदार्थ आयोगाने गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवले आहे.

याशिवाय कॅनडा, उरूग्वे आणि अमेरिकेच्या १५ राज्यांमध्ये वैद्यकीय वापरासाठी गांजाला परवानगी देण्यात आली आहे. यू एनमध्ये यासाठी झालेल्या मतदानात भारतासह २७ देशांनी गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्यासाठी समर्थन दिले तर उर्वरित देशांनी याविरोधात मतदान केले.

विशेष म्हणजे यावेळी भारतानेही गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्याच्या समर्थनार्थ मतदान केलं. तर, चीन,पाकिस्तान आणि रशिया यांसारख्या २५ देशांनी विरोधात मतदान केले. “या ऐतिहासिक मतदानानंतर गांजाच्या औषधी व उपचारात्मक क्षमतेची पडताळणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे”, असं संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटलं आहे.

या निर्णयानंतर गांजापासून बनलेल्या औषधांचा वापर बाजारपेठेत वाढू शकतो. याशिवाय गांजाच्या वैज्ञानिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या संशोधनास चालना मिळू शकेल असा अंदाज व्यक्त जात आहे.

याशिवाय इतर अनेक देश गांजाच्या वापराबाबतच्या आपल्या धोरणामध्ये बदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, सध्या ५० पेक्षा जास्त देशांनी गांजाचं वैद्यकीय महत्त्व समजून घेत गांजाला वैध ठरवलं आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment