Best Sellers in Electronics
Money

मोठी संधी ! लाखो रुपयांची ‘ही’ शानदार एसयूव्ही 11 हजारांत करा बुक

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-स्वस्त कार खरेदी करण्याची सुवर्ण संधी मिळत आहे. जपानची ऑटोमोबाईल कंपनी निसान मोटर्सने भारतात सर्वात स्वस्त एसयूव्ही बाजारात आणली आहे. कंपनीने आपली किंमत इतर कंपन्यांच्या एसयूव्हीपेक्षा खूपच कमी ठेवली आहे.

31 डिसेंबर पर्यंत स्वस्त कार खरेदी करण्याची मोठी संधी:-  जर तुमचे बजेट 5 लाख रुपये असेल आणि तुम्हाला नवीन एसयूव्ही खरेदी करायची असेल तर 31 डिसेंबरपर्यंत तुमच्याकडे चांगली संधी आहे. तुम्ही निसानची एसयूव्ही मॅग्नाइट 4.99 लाखांच्या सुरूवातीच्या किंमतीवर खरेदी करू शकता. वास्तविक, निसान मॅग्नाइट 2 डिसेंबर रोजी भारतीय बाजारात लॉन्च झाली.

11,000 रुपयांच्या टोकन मनीसह बुकिंग:-  निसान मोटर्सने मॅग्नाइट एसयूव्ही 4.99 लाख रुपयांमध्ये बाजारात आणली आहे. कंपनीने 11,000 रुपयांच्या टोकन मनीसह त्याचे बुकिंग देखील सुरू केले आहे. त्याच्या परवडणार्या किंमतीमुळे, मॅग्नाइट भारतातील सर्वात स्वस्त एसयूव्ही बनली आहे. एका विशेष योजनेनुसार 31 डिसेंबर 2020 पर्यंत मॅग्नाइटची प्रारंभिक किंमत 4.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. 31 डिसेंबरनंतर मॅग्नाईटची प्रारंभिक किंमत 5.54 लाख रुपयांवर जाईल. म्हणजेच 31 डिसेंबरपर्यंत बुक केल्यास ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.

फीचर्स

  •  Nissan Magnite में Bi Projector LED हेडलँम्प
  •  LED DRL, LED इंडिकेटर
  •  १६ इंचाची डायमंड कट अलॉय व्हील्स
  •  अँड्रॉयड ऑटो आणि अॅपल कार प्ले सपोर्टचे ८ इंचाचे चस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिले आहे
  •  व्हाइस रिकग्निशन, ऑटोमॅटिक एसी, क्रूज कंट्रोल, हाइट अडजस्टेबल ड्राइवर सीट, क्रूज कंट्रोल, वायरलेस चार्जर आणि एयर प्यूरिफायर सह जबरदस्त फीचर्स या कारमध्ये देण्यात आले आहेत.

दोन इंजिनचा पर्याय:-  निसान एसयूव्हीला दोन पर्यायात आणले आहे. ज्यात एक नॅचरली एस्पिरिटेड पेट्रोल इंजिन आणि एक टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनचा समावेश आहे. ज्यात नॅचरली एस्पिरिटेड पेट्रोल इंजिन ९९९ सीसीचे मोटर देण्यात आले आहे जे 3,500 आरपीएमवर 96 Nm टॉर्क सोबत 6,250 rpm वर 71 bhp पॉवर देते.

दुसरे इंजिन १.० लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन दिले आहे. जे 5,000 आरपीएम वर 99 बीएचपीची पॉवर आणि 2,800 आरपीएम वर 160 एनएम चे टॉर्क जनरेट करते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button