रेखा जरे हत्याकांड : पत्रकार बाळ बोठे अडचणीत , पोलिसांनी केले असे काही…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pअहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी तथा दैनिक सकाळचा संपादक आरोपी बाळ बोठे चांगलाच अडचणीत आला आहे. मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे याच्या विरोधात पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली आहे.

पोलिसांनी विमान प्राधिकरणला तसे कळवले आहे. त्यामुळे बोठे आता विदेशात पळून जावू शकणार नाहीय. पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने याला दुजोरा दिला. तर, पोलिसांच्या पथकाने आज बोठे याच्या घरातून शस्त्र जप्त केले आहे. या शस्त्राचा परवाना ही बोठे याच्याकडे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बाळ बोठे फरार आहे. बोठे याचा शोध घेण्यासाठी पाच पथके पोलिसांनी रवाना केली आहेत. तसेच बोठे याच्या नावाने पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. रेखा जरे खून प्रकरणात एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने सर्व आरोपींना दि.7 डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.

या जरे खून प्रकरणात पत्रकार बाळासाहेब बोठे याचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. तेव्हा पासून बोठे हा फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या धर्तीवर पोलिस प्रशासनाने बाळ ज बोठे याच्या विरोधात लुकआऊट नोटीस काढण्यात आली आहे. याबाबत जिल्हा पोलिस प्रशासनाने देशातील विमान प्राधिकरण यांना पञ दिले असल्याची माहिती समोर आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment