पत्रकार बोठे याच्या अटकेनंतरच उलगडणार रेखा जरे यांच्या हत्याकांडमागील कारण !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-नगरमधील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची गत ३० नोव्हेंबर रोजी रात्री नगर- पुणे महामार्गावर जातेगाव घाट परिसरात हत्या झाली आहे.

या हत्याकांडात पोलिसांनी आतापर्यंत फिरोज राजू शेख, ज्ञानेश्वर शिंदे, आदित्य चोळके, सागर उत्तम भिंगारदिवे, ऋषिकेश ऊर्फ टप्या वसंत पवार या पाच आरोपींना अटक केली आहे. हे सर्व आरोपी नगर जिल्ह्यातील आहेत.

या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार या हत्येची सुपारी ही बोठे व सागर भिंगारदिवे यांनी दिल्याचे पोलीस तपासात समोर आले असल्याचे अधीक्षकांनी सांगितले. बोठे आणि सागर भिंगारदिवे यांनी आरोपी आदित्य चोळके यास सुपारी दिली. त्यानंतर चोळके याने फिरोज शेख आणि ज्ञानेश्वर शिंदे यांना ही सुपारी दिली.

सुपारीमधील ६ लाख २० हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पाटील दिली. या हत्याकांडामागील मुख्य सूत्रधार ज्येष्ठ पत्रकार बाळ बोठे हा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. जरे यांना यापूर्वी देखील २४ नोव्हेंबरला मारण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

दरम्यान, आरोपी बोठे याच्या घराची झडती घेत पोलिसांनी काही साहित्य जप्त केले आहे. कडीत, फत्तेबाद, ता. श्रीरामपूर) तसेच आदित्य सुधाकर चोळके (रा. तिसगावफाटा, कोल्हार, ता. राहाता) या तिघांना अटक केली. यातील मारेकरी शेख व शिंदे यांना चोळके याने सुपारी दिल्याचे पुढे आले.

पारनेर न्यायालयाने या तिघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, तिघांच्या चौकशीत केडगावमधील सागर उत्तम भिंगारदिवे (३१, रा. शास्त्रीनगर, केडगाव) व ऋषिकेश ऊर्फ टम्या वसंत पवार (वय २३, प्रवरानगर, ता. राहाता) यांची नावे पुढे आली. त्यांना अटक केल्यानंतर तपासाला गती मिळून मुख्य सूत्रधाराचा पर्दाफाश झाला.

या घटनेमुळे जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, हत्येचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. बोठे याने रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी का दिली, याचे रहस्य बोठे याच्या अटकेनंतरच उलगडणार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment