किराणा दुकानावर चोरट्यांचा डल्ला ; लाखोंचा माल केला लंपास

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-काही केल्या जिल्ह्यात सुरु असलेल्या चोरीच्या घटनांना रोखण्यात पोलिसांना यश येत नाही . मात्र दुसरीकडे वाढत्या चोरीच्या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांसह आता व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

नुकतेच संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथे नाशिक पुणे महामार्गालगत असलेले किराणा सुपर शॉपी फोडून चोरट्यांनी १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथे नाशिक पुणे महामार्गालगत किरण राजेंद्र भोर यांचे माय मार्ट सुपर शॉपी नावाचे किराणा दुकान आहे.

या दुकानात चोरीची घटना घडली. चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूचा पत्रा उचकटून दुकानात प्रवेश करून गल्ल्यातील ४५ हजार ७२० रुपये रोख रक्कम यांसह किराणा माल संगणक, टी. व्ही. आदी वस्तू चोरून नेल्या. दुकानदार भोर हे दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने ही माहिती घारगाव पोलिसांना दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment