Best Sellers in Electronics
Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingCrimeMaharashtra

कितीही पळाला तरी बाळ बोठेला अटक होणारच…

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्याविरोधात पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली आहे.

रेखा भाऊसाहेब जरे यांची 30 नोव्हेंबरला हत्या झाली होती. राजकीय क्षेत्रातील महिलेची भरदिवसा भररस्त्यात कुटुंबीयांसमोर हत्या झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

यानंतर पोलिसांनी वेगाने तपास करत मारेकऱ्यांना पकडले होते. मारेकऱ्यांची चौकशी केली असता पत्रकार बाळासाहेब बोठे यानेच 6 लाख रुपये देऊन रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर बाळ बोठे फरार झाला होता.

हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बोठे याचा पोलिसांकडून चौफेर शोध सुरू आहे. तो कुठे थांबू शकतो याचा अंदाज घेऊन पोलीस शोध घेत आहेत. येणाऱ्या काळात गरजेनुसार त्याचे बँक अकाउंटही गोठविले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पसार झाल्यानंतर बोठे याला कोण आश्रय देऊ शकते, याचीही माहिती पोलीस घेत आहेत. त्यामुळे कितीही पळाला तरी पोलीस बोठे याच्या मुसक्या आवळणारच हे निश्चित आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button