धक्कादायक! मारहाण करत तरुणीचा विनयभंग

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-संगमनेर शहरात किरकोळ कारणातून जामावाने दोन जणांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. तसेच यावेळी एका तरुणीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करण्यात आले.

याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी भेट देत परिस्थिती नियंत्रणात आणली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरातील जेधे कॉलनी येथे राहणारे विरू किशोर जेधे हा आपल्या घरात झोपलेला असताना यावेळी जवळचा राहणाऱ्या काही युवकांनी त्यांच्या घरासमोर आरडाओरडा केला. त्यामुळे जेधे घराबाहेर आला त्यावेळी जमावाने जेधे यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली व त्यांच्या पुतण्याला मारहाण केली.

यावेळी एका युवतीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करण्यात आले. याबाबत विरू किशोर जेधे याने दिलेल्या फिर्यादीनुसार आकाश बाळू जेधे, दिनेश बाळू जेधे, संदीप बाळू जेधे, सोमा घोडेकर, मयूर चांगरे, बाळू सुवजी जेधे सर्व राहणार जेधे कॉलनी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

 

Leave a Comment