सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याचा निर्णय स्वागतार्ह : काळे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत.

नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत देखील सात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून या निर्णयामध्ये डिसेंबर २०१९ पर्यंतच्या राजकीय, सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळाने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयाचे आमदार आशुतोष काळे यांनी स्वागत केले आहे.

मागील सरकारच्या काळात घेतल्या गेलेल्या अनेक चुकीच्या निर्णयामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना आपल्या न्याय हक्कासाठी वेळोवेळी आंदोलने करावी लागली होती. या सरकारच्या काळातच शेतकऱ्यांनी ऐतिहासिक संपही केला होता. आपल्या न्याय मिळावा व आपल्या मागण्या मान्य कराव्या यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले होते.

या आंदोलनावेळी कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथील शेतकऱ्याला बलिदान द्यावे लागले होते. या आंदोलनादरम्यान कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment