माजी आ. हर्षवर्धन जाधव यांचे चिरंजीव राजकारणात सक्रिय; आईविरोधात उभ केल पॅनल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :- कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव कायम कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत राहतात असतात. पुण्यात जेष्ठ दाम्पत्याला मारहाण केली म्हणून पोलिसांनी त्यांना अटक केली होती.दुसरीकडे ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी उचली आहे.

हर्षवर्धन जाधव राजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्या मुलाच्या वतीने त्यांनी ग्रामपंचायतीला उमेदवार उभी करण्याच घोषणा केली आहे. माजी आ. हर्षवर्धन जाधव यांचे पुत्र आदित्य जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन हि घोषणा केली आहे. वडील हर्षवर्धन जाधव जेलमध्ये असल्यामुळे मुलगा आदित्य जाधव याने पॅनलची अधिकृत घोषणा केली आहे.

आदित्य जाधव याने आपली आई आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची सुकन्या संजना जाधव यांच्या विरोधात पॅनल उभा केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे रायभान जाधव यांची तिसरी पिढी पण राजकारणात सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.

हर्षवर्धन जाधव याना अटक केल्यानंतर आदित्यने सर्व सूत्र स्वतःच्या हातात घेतली आहेत. इतक्या कमी वयात इतकी मोठी जबाबदारी हातात घेतल्यामुळे सर्वांच्या नजर आदित्यवर खिळल्या आहेत.राजकारणात सक्रिय होताना त्यामाध्यमातून तालुक्यातील सर्व ग्रामांचायत निवडणूक लढवण्याची त्याने घोषणा केली.

जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपण वडिलांप्रमाणे सातत्यपूर्ण प्रयत्न करू असं त्यान म्हटल आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.आपल्याविरुद्ध राजकीय आकसाने गुन्हा दाखल केल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी म्हटले असल्याचे कळतय.

Leave a Comment