महिलेच्या पर्समधून चोरट्याने चार तोळ्याचे दागिने लांबवीले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-काही केल्या जिल्ह्यातील चोऱ्या, लुटमारीच्या घटनांना रोख लावण्यात पोलिसांना यश येताना दिसत नाहीये.कारण दिवसाढवळ्या होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नुकतेच संगमनेर शहरातील बसस्थानकामध्ये गर्दीचा फायदा घेऊन प्रवासी महिलेच्या पर्समधून सुमारे चार तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली आहे.

दरम्यान या संबंधित महिलेने संगमनेर शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर तालुक्यातील चिखली येथील साधना अण्णासाहेब हासे ही महिला संगमनेर बसस्थानकातून नाशिक-पुणे बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने संधीचा फायदा घेत महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने लांबविला आहे.

याप्रकरणी साधना हासे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विजय खाडे हे करत आहे.

Leave a Comment