गळफास घेत तरुणाने विझवली आयुष्याची ज्योत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :- साडीच्या पदराने गळफास घेऊन एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कर्जत तालुक्यात घडली आहे.

सादिक बशीर शेख (२८, हल्ली राहणार राहुरी शहर, मूळ गाव बारडगाव सुद्रिक, तालुका कर्जत) असे आत्महत्याग्रस्त तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, विवाहित असलेला सादिक मोलमजुरी करत होता. रात्री मित्रांनी सादिकच्या घराचा दरवाजा ठोठावला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडण्यात आला.

छताच्या बल्लीला साडीचा पदर बांधून गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत सादिक आढळला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. बारडगाव सुद्रिक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्याच्यामागे आई, वडील, चार बहिणी असा परिवार आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. पुढील तपास पोलिस नाईक शिवाजी खरात करत आहेत.

Leave a Comment