India

फास्टॅग संदर्भात मोठी बातमी ; मुदत वाढली, ‘ही’ आहे अंतिम तारीख

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- फास्टॅगशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. फास्टॅग अनिवार्य करण्यासाठी सरकारने अंतिम मुदत 15 फेब्रुवारीपर्यंत वाढविली आहे.

यापूर्वी ही अंतिम तारीख 31 डिसेंबर होती. रस्ते वाहतूक मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग (एनएच) नेटवर्कवरील टोल शुल्काच्या फास्टॅगच्या माध्यमातून 100 टक्के वसुलीसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढविली आहे. एनएचएआयने यापूर्वी 1 जानेवारी 2021 पासून संपूर्णपणे फास्टॅगद्वारे टोल शुल्क घेण्याची घोषणा केली होती.

तथापि, 1 डिसेंबर, 2017 पूर्वी विकल्या गेलेल्या एम आणि एन श्रेणी चारचाकी वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य झाले आहे. त्यासाठी केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मध्ये सुधारणा करण्यात आली.

ही मुदत का वाढविण्यात आली :- फास्टॅगची अंतिम मुदत पुढे ढकलण्यात आली आहे कारण बरेच लोक अद्याप राष्ट्रीय महामार्गांवर टोल देयकासाठी रोकड वापरतात. सध्या टोल प्लाझावरील फास्टॅग पेमेंट्सचा वाटा 75-78% च्या दरम्यान आहे.

म्हणजेच 20-22 टक्के लोक अजूनही रोख रक्कम वापरत आहेत. टोल प्लाझामधील रोकड पेमेंट संपवण्याची सरकारची इच्छा आहे, त्यासाठी एका लेन वगळता इतर सर्व लेन फास्टॅग व्यवहारासाठी समर्पित करण्यात आल्या आहेत आणि त्याचं नाव FASTag Lanes असे ठेवण्यात आले आहे.

डबल चार्ज भरावा लागेल :– या लेनमध्ये फास्टॅगशिवाय कोणतेही वाहन सापडल्यास मालकास टोल फी दुप्पट भरावी लागेल. राष्ट्रीय महामार्गांवरील रोखीचे व्यवहार संपवण्याचा सरकारचा मानस आहे आणि म्हणूनच जानेवारी 2021 पासून सर्व वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात आले. पण सध्या हा निर्णय बदलण्यात आला आहे.

येथून आपण फास्टॅग घेऊ शकतो :-

 • – टोल प्लाजा
 • – राष्ट्रीय राजमार्गावरील पेट्रोल पंप
 • – आरटीओ
 • – एनएचएआय ऑफिस
 • – ई-कॉमर्स वेबसाइट , उदा . अमेझॉन , फ्लिपकार्ट, पेटीएम आदी
 • – बॅंक्स (आयसीआयसीआय, एचडीएफसी, एक्सिस आदी)
 • – मोबाइल बँकिंग ऍप्स
 • – माय फास्टैग ऍप्स, सुखद यात्रा ऍप
 • – एनएचएआई, आईएचएमसीएल, एनपीसीआई वेबसाइट्स

या कागदपत्रांची आवश्यकता असेल फास्टॅग खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या कागदपत्रांची प्रत त्याच्या अर्जासोबत द्यावी लागेल.:-

 • – आरसी (नोंदणी प्रमाणपत्र)
 • – वाहन मालकाचे केवायसीची कागदपत्रे
 • – या दोन कागदपत्रांव्यतिरिक्त व्यक्तीला आयडी प्रूफ आणि पत्ता पुरावा देण्यासाठी खालील कागदपत्रांची प्रत द्यावी लागेल आणि पासपोर्ट आकाराचा फोटो लागेल.
 • – ड्राइविंग लाइसेंस
 • – वोटर आईडी कार्ड
 • – पॅन कार्ड
 • – आधार कार्ड (पत्त्यासह)
 • – पासपोर्ट

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button