चोरांचा शिरजोरपणा गुन्हा मागे घेण्यासाठी फिर्यादीस धमकी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- चोरी गेलेली गाय परत मिळण्यासाठी अरुणा शिवाजी मांडे यांनी थेट पोलीस अधिक्षक कार्यालय गाठून, आरोपी दाखल केलेला चोरीचा गुन्हा मागे घेण्यासाठी धमकावत असून, पोलीस प्रशासन आरोपींवर कारवाई न करता सदर प्रकरणाचा तपास करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप केला.

तर गाय चोरांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी कि, मार्केटयार्ड येथील भवानीनगर येथील अरुणा शिवाजी मांडे या गो पालनाचा व्यवसाय करीत आहे.

मागील वर्षी शिवाजी यांच्या बंधूकडून गाय आणण्यात आली होती. ती गाय दि.13 डिसेंबरला चोरीस गेली. याप्रकरणी चौकशी केली असता वाकोडी (ता. नगर) येथील एका दलालाकडे ही गाय पाहण्यात आल्याचे कळले.

त्यांच्या घरी चौकशी केली असता काही व्यक्तींनी गाय विकण्यास दिली असल्याचे समजले. याप्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनला गणेश फुलसौंदर, प्रविण फुलसौंदर, रविंद्र फुलसौंदर, सयाजी शिंदे, दत्तात्रय फुलसौंदर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दलालास गाय विक्रीसाठी देणार्‍या आरोपींना घरी जाऊन विचारणा केली असता त्यांनी गाय चोरीचा दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी धमकावले असल्याचा आरोप शिवाजी मांडे यांनी केला आहे. गाय चोरणारे व्यक्ती गुन्हा मागे घेण्यासाठी धमकावत असून, आमच्या कुटुंबीयांस धोका निर्माण झाला आहे.

तर उरलेली जनावरे देखील चोरीस जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणी पुरावा असलेले व्हिडिओ रेकॉर्डिंग घेऊन पोलीस स्टेशनला सदर व्यक्तींविरोधात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलीसांनी व्यवस्थितपणे तक्रार दाखल करुन घेतली नाही.

याप्रकरणी सखोल चौकशी केल्यास यामधील मुख्य आरोपी व सूत्रधार मिळण्याची शक्यता आहे. तातडीने संबंधीत व्यक्तीकडून गाय मिळवून द्यावी, अन्यथा कुटुंबीयांसह पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा मांडे कुटुंबीयांनी दिला आहे.

Leave a Comment