Ahmednagar CityAhmednagar News

आपले कला-गुण विकसीत करण्यासाठी युवकांमध्ये संवाद कौशल्य आवश्यक -डॉ. अमोल बागुल

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :- आपले कला-गुण विकसीत करण्यासाठी युवकांमध्ये संवाद कौशल्य आवश्यक आहे. त्यासाठी वाचन करणे महत्त्वाचे आहे. पुस्तकाचे वाचन करून युवकांनी वैचारिक क्षमता प्रगल्भ केली, तर उत्तम संभाषण करता येते.

उत्तम संभाषण कौशल्य असल्यास आपल्या कामाची वेगळी छाप पडत असल्याची भावना राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार प्राप्त डॉ. अमोल बागुल यांनी केले. भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र आयोजित जिल्हास्तरीय युवा सांसद स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. बागुल बोलत होते.

टिळक रोड येथील नेहरू युवा केंद्राच्या कार्यालयात ही स्पर्धा युवक-युवतींच्या उपस्थितीमध्ये पार पडली. नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शक म्हणून जय युवाचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे, सौ. खरात,

उडान फाऊंडेशनच्या अध्यक्षा आरती शिंदे, द युनिव्हर्सल फाऊंडेशनच्या सचिव आदिती उंडे, सागर अलचेट्टी, नर्मदा फाऊंडेशनचे ह.भ.प. सुनील महाराज तोडकर, दिनेश शिंदे, रमेश गाडगे, लेखापाल सिद्धार्थ चव्हाण आदी उपस्थित होते.

जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात यांनी युवा सांसदच्या माध्यमातून शिक्षण, शेती, कोरोना संकट, सद्यस्थितीच्या उपाययोजना, शासनाचे धोरण याबाबत विचार मांडण्याचे प्रभावी माध्यम आहे. युवकांची वैचारिक देवाण-घेवाण होण्यासाठी युवासांसद महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

आरती शिंदे यांनी आजचे युवा पिढी वाचन व संस्कार अभावी भरकटत चाललेली आहे. राष्ट्रीय सेवा योजना, नेहरू युवा केंद्र सातत्याने विविध उपक्रमाच्या माध्यमातून युवकांचे नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

युवा सांसदच्या माध्यमातून वक्तृत्व विकसित होणार असल्याची भावना व्यक्त केली. अ‍ॅड. ह.भ.प. सुनील महाराज तोडकर यांनी आजचा युवक मोबाईलच्या विळख्यात गुरफटलेला आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी युवा सांसद सारख्या उपक्रमाची गरज आहे. युवकांमध्ये वैचारिक बदल घडले पाहिजे स्पर्धेतून युवक-युवतींना आपले गुण-दोष लक्षात येतात खेळाडू वृत्ती जपली जाते असल्याचे सांगितले.

युवा सांसदचे परीक्षण डॉ.अमोल बागुल, अ‍ॅड. महेश शिंदे, आदिती उंडे, आरती शिंदे, अ‍ॅड. सुनील तोडकर यांनी केले. यावेळी नेहरू युवा केंद्राचे तालुका स्वयंसेवक, जिल्हा भरातील युवा मंडळाचे पदाधिकारी व स्पर्धक उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत दिनेश शिंदे यांनी केले. आभार रमेश घाडगे यांनी मानले.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button