Money

सॅमसंगचे दोन मोबाईल मिळणार स्वस्तात; किंमती ऐकून तुम्हीही व्हाल चकित

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :-सॅमसंग आपल्याकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेहमीच मार्केटमध्ये धमाका करत असते. यावेळीही सॅमसंगने थेट आपले दमदार फीचर्स असलेल्या स्मार्टफोनच्या किमती हजारोंनी कमी केल्या.

Galaxy Buds+, Galaxy M01s या फोनच्या किमती कमी करत आता कंपनीने धडकेबाज पाऊल उचलले आहे. 11 हजार 990 रुपयांना मिळणारा Galaxy Buds+ हा फोन आता तुम्हाला अवघ्या 8 हजार 990 रुपयांना मिळणार आहे.

तर 9 हजार 499 रुपयांत मिळणारा Galaxy M01s हा फोन आता 8 हजार 999 रुपयात उपलब्ध होईल. Galaxy Buds Live ची किंमतही 3 हजारांनी कमी केली असून तो आता 14 हजार 990 रुपयांऐवजी 11 हजार 990 रुपयांना मिळणार आहे.

Galaxy M01s चे फीचर्स :-

  • – 5.71 इंचांचा डिस्प्ले आणि 6.2 इंचांचा डिस्प्ले
  • – ड्यूअल कॅमेरा सेटअप
  • – 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज
  • – 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलची लेन्स
  • – 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
  • – 4000mAh ची दमदार बॅटरी

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button