टेम्पो चालकाच्या वेगाने ‘त्या’ निरपराधांचा गेला बळी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :-शहरातील नगर- मनमाड रोडवरील अ‍ॅपेक्स हॉस्पिटलच्या समोर एक अपघात झाला. यामध्ये एकाच मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, निलेश चंद्रकांत जाधव यांनी फिर्याद दिली आहे. नगर- मनमाड रोडवरील अ‍ॅपेक्स हॉस्पिटलच्या समोर सचिन चंद्रकांत जाधव (वय- 35 रा. सुर्यानगर, तपोवन रोड, नगर) त्यांच्या बंद दुचाकीवर बसले होते.

यावेळी वेगात आलेल्या टेम्पो चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने त्याने सचिन बसलेल्या असलेल्या दुचाकीला धडक दिली.

या धडकेत सचिन यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात टेम्पो (एमएच 14 इएम 7480) चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment