निवडणूक रणांगण ! आठ दिवसात अकराशेहून अधिक अर्ज दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- राज्य निवडणूक आयोगाने १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. १५ जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्यासाठी २३ डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती.

त्याचबरोबर अकोले तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या असून दि.23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत 1147 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे.

दि. 31 डिसेंबर रोजी अर्जाची छाननी होती, त्या छाननी मध्ये 1132 उमेदवारी अर्ज वैध ठरले असून 15 अर्ज अवैध ठरविण्यात आले आहे.

त्यामध्ये लिंगदेव, चैतन्यपूर, टाकळी, ब्राह्मणवाडा, बेलापूर, रुंभोडी, पिंपळदरी, मन्याळे, धामणगाव पाट व देवठाण या गावांच्या उमेदवारी अर्जापैकी काही अर्ज अवैध ठरविण्यात आले आहे.

1147 उमेदवारी अर्जापैकी 15 अर्ज अवैध ठरविण्यात आल्याने आता निवडणुकीसाठी 1132 अर्ज राहिले असून आता दि. 4 जानेवारी रोजी माघारीच्या दिवशी किती ग्रामपंचायती बिनविरोध होतात व किती ग्रामपंचायतीच्या निवडणूका होतात हे समजणार आहे.

Leave a Comment