निवडणूक रणधुमाळी ! पुढाऱ्यांची डोकेदुखी वाढली; हजारो उमेदवारी अर्ज दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- राज्य निवडणूक आयोगाने १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. १५ जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्यासाठी २३ डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती.

अहमदनगर जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतीमधील 7 हजार 134 सदस्य पदाच्या जागांसाठी 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्याbशेवटच्या दिवसापर्यंत 23 हजार 803 अर्ज दाखल झाले होते.

या अर्जाची छाननी होऊन त्यात 619 अर्ज अवैध ठरले आहेत. तर 23 हजार 184 वैध ठरले आहेत. दरम्यान ऐवढ्या मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने आता माघारीसाठी गावागावातील पुढारी सरसावले आहे.

इच्छुकांच्या माघारीसाठी मित्र, नातेवाईक तसेच अन्य मार्गाने दबाव आणला जात आहे. कोण किती यशस्वी झाले हे सोमवारी माघारीनंतरच स्पष्ट होणार आहे.

15 जानेवारीला होणार्‍या या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 4 जानेवारीपर्यंत माघारीसाठी मुदत आहे. यंदा विक्रमी अर्ज दाखल झाल्याने

कमी कालावधीत मोठ्या संख्याने अर्ज काढण्यासाठी नेत्यांना वेळ पुरणार का हे येत्या दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावागावातील राजकीय वातावरण तापले असून येत्या काही दिवसांत त्यात चांगली वाढणार आहे.

Leave a Comment