नौकरीच्या आमिष दाखवून अनेकांना 50 लाखांना लुटले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- नौकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तिघा जणांनी 24 जणांकडून वेळोवेळी 50 लाख 10 हजार रुपये घेवून पोबारा केला आहे.

यादरम्यान आपली फसवणूक झाल्याची समजताच तिघाजणांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी एकनाथ मल्हारी रणदिवे (रा. रेल्वे स्टेशनजवळ, नगर) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अल्लाउद्दीन ऊर्फ बाबा मोहंमद खान, जाकीर अल्लाउद्दीन खान (रा. रेल्वेस्टेशन जवळ, नगर) व विनय काळे (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, यातील संशयित आरोपी जाकीर खान हा महावितरण कंपनी, नाशिक येथे अतिरिक्त कार्यकारी अभियंता असल्याचे अल्लाउद्दीन खान व जाकीर खान यांनी रणदिवे यांना सांगितले होते.

2018 मध्ये नाशिक महावितरण कंपनीत विविध पदांच्या जागा भरायाच्या असल्याचा खोटा बनाव करून अल्लाउद्दीन याने रणदिवे यांना विश्‍वासात घेतले. अल्लाउद्दीन याने तोतया अभियंता विनय काळे याला वेळोवेळी उभा करून रणदिवे यांच्यासह त्यांच्या 24 नातेवाईकांकडून 50 लाख 10 हजार रुपये रोख स्वरूपात घेतले.

मात्र, महावितरण कंपनीत नोकरी दिलीच नाही. दरम्यान, रणदिवे यांनी नातेवाईकांच्या मदतीने आरोपींकडे पैशाची मागणी केली असता, त्यांनी 50 लाख 10 हजार रुपयांचा धनादेश दिला.

तो धनादेशवटला नसल्याने रणदिवे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कचरे करीत आहे.

Leave a Comment