Money

स्वतःचा बिझनेस करायचाय? मग सरकार बरोबरच करा व्यवसाय ; जाणून घ्या मोदी सरकारची ‘ही’ योजना

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- अनेक लोक असे आहेत कि ज्यांना नोकरीचा कंटाळा आलेला असतो. तसेच असे अनेक युवक आहेत कि जे बेरोजगार आहेत आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे.

बऱ्याच लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची आवड असते. परंतु काय करावे याची नेमकी गाईडलाईन मिळत नाही. परंतु आता तुम्ही सरकारच्या मदतीने नवा व्यवसाय सुरू करू शकता. जाणून घेऊयात याविषयी सविस्तर –

गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस (GeM) :- केंद्र सरकारने सर्व सरकारी विभागांना गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेसशी (GeM) जोडले आहे. आता सरकारी विभाग त्यांच्या उपयोगासाठी आवश्यक वस्तू आणि सेवा ई पोर्टल GeM च्या माध्यमातून खरेदी करतील. ही सर्व खरेदी ऑनलाईन होईल. तुम्ही देखील या पोर्टलशी जोडले जाऊन सरकारबरोबर व्यवसाय करू शकता.

तुम्ही घरबसल्या यामध्ये नोंदणी करून व्यवसाय करू शकता. तुमचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर विविध सरकारी विभागातील मागणीच्या हिशोबाने पुरवठा करू शकता. याकरता तुम्हाला मॅन्युफॅक्चररशी संपर्क करावा लागेल, जेणेकरून मागणी आल्यानंतर तुम्ही तुमच्या व्यवसायातील माल पुढे पाठवू शकता.

कोण करू शकतो ‘हा’ व्यवसाय ? :- कोणताही विक्रेता या जो एखादं उत्पादन करतो किंवा उपयुक्त आणि प्रमाणित उत्पादनाची विक्री करतो तो GeM वर नोंदणी करू शकतो. यानंतर भारत सरकार मधील कोणताही विभाग टेंडर काढणार असतील तर याची माहिती तुम्हाला मिळेल आणि या टेंडरसाठी तुम्ही बोली लावू शकता किंवा निविदा देऊ शकता.

 ‘असे’ करा रजिस्ट्रेशन –

  • – तुम्हाला GeM वर जावे लागेल.
  • – फॉर्म आणि इतर माहिती भरावी
  • – याठिकाणी तुम्हाला आयडी-पासवर्ड जनरेट करावा लागेल.
  • – एकदा रजिस्ट्रेशन झाले की, सरकारच्या कोणत्याही खरेदीबाबतच्या टेंडरची माहिती तुम्हाला SMS च्या माध्यमातून पाठवली जाईल.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button