अल्पवयीन मुलावर अत्याचार करणाऱ्या आरोपीस पोलिसांकडून अटक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :- संगमनेर शहरातील एका उपनगरातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलावर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी पिडीत मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून अल्ताफ उर्फ लाला असिफ शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान अल्पवयीन मुलाला मारहाण, शिवीगाळ करुन त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपी अल्ताफ ऊर्फ लाला असिफ शेख (रा. कुरण) यास पोलिसांनी अटक केली आहे.

तसेच या आरोपीला काल पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास 5 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अत्याचार करणारा नराधम हा पिडीत बालकाचा सावत्र पिता आहे. दरम्यान हा पिडीत मुलगा हा पिंपरी चिंचवड पुणे येथील रहिवासी आहे.

सद्या तो संगमनेर येथे राहतो या मुलावर शेख याने अनैसर्गिक अत्याचार केला. तसेच त्यास शिवीगाळ व मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे हे करत आहे. या घटनेने कुरण ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.

या घटनेतील आरोपी अल्ताफ शेख याच्यावर यापूर्वीही विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याला साथ देणार्‍या साथीदाराचाही पोलीस शोध घेत आहे.

Leave a Comment