Best Sellers in Electronics
Ahmednagar NewsIndiaMaharashtraMoney

खुशखबर ! बीएसएनएलचे नववर्षात गिफ्ट ; वाचा अन फायदा घ्या

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :- सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या नवनवीन प्लॅन बाजारात आणत आहेत. लॉकडाउनच्या काळात इंटरनेटचा वाढता वापर पाहता अनेक नवनवीन स्कीम अनेक कंपन्यांनी बाजारात आणल्या आहेत.

आता बीएसएनएलने जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या आघाडीच्या खासगी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी अनेक बदल स्वतःमध्ये केले आहेत.

दूरसंचार उद्योगातील वाढत्या स्पर्धेदरम्यान, बीएसएनएलने नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक फ्री मध्ये सिम देण्याची योजना जाहीर केली आहे. या नव्या ऑफरअंतर्गत कंपनी एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन-आयडिया यासह अन्य टेलिकॉम कंपन्यांशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करेल.

तर जर आपण बीएसएनएल युजर्स असाल तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. कंपनीने मोफत सिम ऑफर 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढविली आहे.

31 जानेवारी पर्यंत तुम्हाला सिमकार्ड विनामूल्य मिळू शकेल :- देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने फ्री सिम ऑफर मध्ये 31 जानेवारी पर्यंत मुदतवाढ दिली असून मोफत सिम ऑफरचा विस्तार केला आहे. दूरसंचार कंपनीने आपली माहिती तामिळनाडू वेबसाइटद्वारे दिली आहे.

सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने 17 डिसेंबरपासून सिम विनामूल्य देण्यास सुरूवात केली आहे. बीएसएनएल फॅमिली-फ्री सिम ऑफर असे या ऑफरचे नाव असून ती 1 जानेवारीला संपणार होती. तथापि, कंपनीने आता ही ऑफर 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढविली आहे. म्हणजेच या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना आणखी एक महिना आहे.

बीएसएनएल फ्री सिम ऑफर काय आहे ते जाणून घ्या :- या ऑफरअंतर्गत कंपनीत सामील झालेल्या नवीन ग्राहकांना किंवा पोर्टनंतर बीएसएनएलमध्ये येणाऱ्या वापरकर्त्यांना नि: शुल्क सिम देण्यात येईल. सध्या बीएसएनएलचे सिम कार्ड 20 रुपयांच्या किंमतीवर उपलब्ध आहे परंतु ऑफर अंतर्गत त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

ही ऑफर 31 जानेवारीपर्यंत वाढविण्याची घोषणा बीएसएनएलच्या तमिळनाडूच्या वेबसाइटवर करण्यात आली आहे.

विनामूल्य सिम कार्ड कसे मिळवायचे ते जाणून घ्या :- मोफत सिमकार्ड मिळण्यासाठी कंपनीने अटदे ठेवली आहे. यासाठी तुम्हाला 100 रुपयांचे एफआरसी (फर्स्ट रिचार्ज कूपन) करावे लागेल. वास्तविक जेव्हा जेव्हा ग्राहक एखाद्या कंपनीकडून नवीन सिम घेतात, तेव्हा सिम घेताना प्रथम रिचार्ज करावा लागतो, याला एफआरसी म्हणतात. त्याची किंमत कंपनीनुसार वेगवेगळी असते.

बीएसएनएलच्या विनामूल्य सिम सुविधेसाठी तुम्हाला किमान 100 रुपये रिचार्ज करावे लागतील. ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या जवळच्या बीएसएनएल स्टोअरला भेट द्यावी लागेल आणि किमान 100 रुपयांच्या एफआरसीद्वारे विनामूल्य सिम मिळू शकेल.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button