विद्यार्थानो लक्ष द्या…दहावी व बारावीच्या परीक्षांबाबत शिक्षणमंत्री म्हणाल्या….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :-गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुळे शाळा, कॉलेज यांसह सर्वच शिक्षण संस्थावर परिणाम झाला. त्यामुळे यंदा शैक्षणिक वर्ष देखील लांबल आहे.

त्यामुळे आता परीक्षा देखील लांबणार आहेत. या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीच्या परीक्षांबाबत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे.

यंदा 10 वी परीक्षा 1 मे नंतर आणि 12 वीच्या परीक्षा 15 एप्रिलनंतर अपेक्षित असल्याचे गायकवाड म्हटले आहे. तसेच दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे निकाल 15 जुलैच्या आत लागतील, अशीही घोषणा शिक्षण मंत्र्यांनी केली आहे.

दरम्यान, शिक्षण विभागाने प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनावर शाळा सुरू करण्याचा निर्णय सोपविल्यामुळे मुंबई पालिका प्रशासनाने ३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

आता नवीन वर्षातही आणखी १५ दिवस शाळा व शैक्षणिक संस्था बंदच राहणार असून ऑनलाइन शिक्षण पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहे.

ठाणे जिल्हा परिषदेकडून सर्व शाळांच्या मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयीन प्राचार्यांना शाळा व शैक्षणिक संस्थांना पूर्वतयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मुंबईत शाळा सुरू करण्यासाठी चाचपणी सुरू असून लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment