मुंबईहून मुळा धरणापर्यंत सी-प्लेन सेवा सुरू होणार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :- महाराष्ट्रात मुंबई ते शिर्डीसह लोणावळा आणि गणपतीपुळे यांसारख्या प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर सीप्लेनही सेवा सुरु केली जाणार आहे. त्यासाठी जलपरिवहन मंत्रालयाने जलवाहतूक सेवेसाठी कंपन्यांचे प्रस्ताव मागवले आहेत.

ही सेवा झाल्यास भक्तांना साईदर्शनासह या हवाई प्रवासाचा वेगळा आनंद मिळणार आहे. नुकतेच अहमदाबाद ते केवडिया सीप्लेनमधून प्रवास सुरू असून आता महाराष्ट्रासह देशभरात अशी सेवा सुरु होणार आहे.

केंद्र सरकार यावर काम करत आहे. केंद्र सरकारच्या जलपरिवहन मंत्रालयाने जलवाहतूक सेवेसाठी कंपन्यांचे प्रस्ताव मागवले आहेत.

यात दिल्लीच्या यमुना नदी किनार्‍यापासून अयोध्या, टिहरी, श्रीनगर (उत्तराखंड) आणि चंडीगड, मुंबई ते शिर्डी, लोणावळा आणि गणपतीपुळे, सूरत ते द्वारका, मांडवी आणि कांडलासह अंदमान आणि निकोबार, लक्षद्वीप समुहासाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.

इच्छुक कंपन्यांना 22 जानेवारी 2021 पर्यंत केंद्राच्या या महत्वाकांक्षी योजनेवर प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

दरम्यान मुंबईहून मुळा धरणापर्यंत सी-प्लेन सेवा सुरू करण्याचे प्रस्तावित असून या सेवेद्वारे शिर्डी, शनि-शिंगणापूर आणि मेहेराबाद ही श्रध्दास्थाने जोडली जाणार आहेत. याचा लाभ भाविकांना होणार आहे.

Leave a Comment