नव्या वर्षात तुमच्या अर्थविश्वाची नव्याने सुरुवात करा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :-२०२० हे वर्ष अनेक लोकांसाठी प्रचंड चढ-उतारांचे वर्ष होते. मात्र, व्यवसायांसाठी हा पूर्वी कधीही आला नाही, असा वाईट अनुभव होता.

उत्पादनाची मागणी आणि पुरवठ्यात असंख्य वळणे आली. लॉकडाऊनचे वाढलेले आठवडे, महिने, यामुळे २०२० मध्ये व्यवसाय टिकवून ठेवण्याचे खरोखर आव्हान होते. परिणामी गुंतवणुकीसाठीही हा काळ कठीण होता. अर्थात पहिला अनुभव नेहमीच कठीण असतो.

२०२० संपलेय, त्यामुळे जे काही घडले, ते मागे टाकण्याची आणि काहीतरी नवे करण्याची वेळ आली आहे. बाजार विस्कटलेली घडी नव्याने बसवत असताना तुमच्या अर्थविश्वाची नवी सुरुवात करण्याच्या पाच मार्गांबद्दल सांगताहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे इक्विटी स्टॅटजिस्ट-डीव्हीपी श्री. ज्योती रॉय.

१. जोखीम पेलण्याच्या क्षमतेचा पुनर्विचार करा :- २०२० हे वर्ष अनेकांसाठी धक्कादायक ठरले. त्यांच्या पोर्टफोलिओत प्रचंड जोखीम असल्याने ते उद्विग्न, अस्वस्थ झाले. एवढेच नाही तर त्यांनी मौल्यवान धातू आणि रिअल इस्टेटसारख्या पर्यायी गुंतवणूकीचा मार्ग निवडला.

अर्थात जोखीमीच्या पैलूला संपूर्ण दोष देता येत नाही. कारण महामारीमुळे सर्वच क्षेत्रात धुळधाण उडाली. अर्थात, विविधता हा समस्येचा एक भाग होता आणि जोखीम व्यवस्थापन धोरण हा दुसरा भाग. आता नव्या वर्षाला सामोरे जाताना, नवी गुंतवणूक आणि सुधारीत पोर्टफोलिओ यांद्वारे जोखीमीची नव्याने व्याख्या करता आली.

नव्याने उभारी घेणाऱ्या बाजारात कोण-कोणत्या प्रकारची जोखीम असू शकते आणि तुमची स्वत:ची आर्थिक स्थिरता एकंदरीत साथीच्या काळात कशा प्रकारे विकसित झाले आहे, या सर्वांचा विचार केला पाहिजे. मागील वर्षात तुमची जोखीम पेलण्याची सहनशक्ती कमी झाली आहे का?

कमोडिटीज ट्रेडिंगमध्ये तुम्ही तुमच्या बचतीपैकी ८० टक्के भाग गुंतवू शकता का किंवा तुम्ही कमी जोखीम असलेले पर्याय शोधायला हवेत का, उदा. हायब्रिड म्युच्युअल फंड्स? त्यामुळे पुढे जाण्यासाठी थोडा वेळ आपली धोका पत्करण्याची क्षमता किती आहे, यावर अवश्य विचार करा.

२. आत्मविश्वासाचा आणखी एक धडा :- साथीच्या प्रसाराची बातमी गुंतवणुकदारांपर्यंत पोहोचू लागली, तशी पॅनिक स्थिती होऊन विक्री सुरु झाली. सिक्युरिटीजमध्ये लोअर सर्किटची स्थिती उद्भवली. हाय ग्रोथ असलेल्या फंड्समध्ये ज्यांनी आपल्या बचतीचा मोठा वाटा गुंतवला होता, अशा दीर्घकालीन गुंतवणूकदारांमध्ये असंतोष वाढू लागला.

बाजार कशा प्रकारे कोसळला यापेक्षा साथीनंतरचे परिणाम येथे लक्षात घेण्यासारखे आहेत. ही घसरण सुरूच राहिली का? अर्थातच नाही. विशेष म्हणजे, सुधारणा अधिक जोमाने झाली. कोव्हिडच्या काळातही बाजार कसा वृद्धींगत होतोय, यावर सार्वजनिक रित्या फोरम्समध्ये तज्ञांना प्रश्न विचारण्यात आले.

एफएमसीजी आणि तंत्रज्ञानासारख्या काही क्षेत्रांत विक्रमी वाढ झाली आणि तंत्रज्ञानासंहंधी म्युच्युअल फंडांनीही वार्षित परताव्याचा दर ६२+% एवढा दर्शवला.

त्यामुळे आत्मविश्वासाचा धडा पुन्हा घेण्याची ही वेळ आहे. शेअर बाजार अल्पावधीत कोसळू शकतो, पण काही काळात अधिक वृद्धीने ही घसरण संतुलित होते. त्यामुळे यातून शिकवण घ्या व पुढील वर्षात गुंतवणूक काढून घेण्याची इच्छा होईल, तेव्हा या प्रसंगाचे स्मरण अवश्य करा.

३. बाजार रीबूट होताना कीवर्ड शोधा :- बाजार रीबूट होतोय, हे ऐकल्यावर तुम्हाला काय वाटते. रिबूट हा इथे स्पष्टपणे कीवर्ड आहे. लॉकडाऊननंतर, कंपन्यांनी त्यांचा व्यवसाय रिस्टार्ट करण्यावर भर दिला. बातम्यांमध्ये ज्या बद्दल बोलले जाते, त्या प्रकारचे हे रिबूटिंग नाही.

खरं तर रीबूटची प्रक्रिया निरंतर सुरू राहील. साथीचे बाजारावर दीर्घकालीन परिणाम जाणवतील. २०२१ मध्ये गुंतवणूक करताना, दीर्घकालीन शक्यतांचे मूल्यांकन करताना हा महत्त्वपूर्ण घटक मानला पाहिजे. काही उदाहरणांसह याचा विचार करा.

निर्मिती क्षेत्रात, ज्या कंपन्या आपले कामकाज सुधारण्यासाठी ऑटोमेशन आणि नव्या उद्योग तंत्रज्ञानावर गुंतवणुक करत नाहीत, त्यांच्यावर साथीनंतर तुलनात्मकरित्या गंभीर तोटा झाला. किंबहुना, अशा कंपन्यातून गुंतवणूक काढून घेणे कधीही सोयीस्कर. दीर्घकालीन वृद्धीचे योजन असलेल्या कंपनीत गुंतवणूक करावी.

प्रमुख गुंतवणुकींसाठी तंत्रत्रान हा सर्वात मोठा लाभदायी घटक ठरेल. कारण साथीच्या नंतरच्या युगात बहुतांश व्यवसायिक नव्या तंत्रज्ञानावर गुंतवणूक करत आहेत. बाजार रीबूट होण्याची गती वेगवेगळी असेल- पुढील वर्षात एखाद्या दीर्घकालीन गुंतवणुकीत अडकण्यापूर्वी नवीन ट्रेंडकडे लक्ष द्या.

४. सेक्टर रोटेशनचे महत्त्व :- २०२० मधील विविध क्षेत्रांची कामिगिरी पहा. नफ्यात असलेल्या सर्वांचीच एकाचवेळी चांगली कामगिरी झाली नाही. एखाद्या क्षेत्राच्या कामगिरीबद्दल अंदाज बांधताना २०२१ या वर्षात अनेक नव्या घटकांचा विचार करावा लागेल.

२०२० मध्ये लॉकडाऊननंतर आ‌वश्यक वस्तूंची मागणी वाढली आणि त्यानंतर सामान्य व उन्ननत पातळीदरम्यान चढ-उतार दिसून आला. उर्जा आणि युटीलिटीची मागणी कमी झाली.

तर इतर क्षेत्रांना टेक स्टॉक्सनी मागे टाकले. इथे सेक्टर रोटेशन, ही संकल्पना लक्षात घेतली पाहिजे. सेक्टर रोटेशन ही एक निरंतर प्रक्रिया असून तुमच्या पोर्टफोलिओत सतत काहीतरी वळणे मिळाली पाहिजेत.

गुंतवणुकदारांपर्यंत खूप मोठी बातमी पोहोचते तेव्हा किंमतींवर अल्प किंवा मध्यम काळासाठी गंभीर परिणाम होतात. परिणामी आपला पोर्टफोलिओही प्रभावित होतो. त्यामुळे आपल्या पोर्टफोलिओचा नियमित आढावा घेऊन पुढे जाण्याची सवय ठेवा. जेणेकरून बाजारातील सर्वोत्तम संधी तुम्ही गमावणार नाहीत.

५. ठिपके जोडणारा रीबूट झालेला ग्राहक :- मागील वर्षात तुम्ही जीवनशैली कशा प्रकारे बदलली? तुमचा खर्च व भविष्यातील योजना कशा बदलल्या? याच धर्तीवर इतर लोक देखील त्यांचे आयुष्य बदलण्याचा विचार करत असून गोष्टी बदलत असतील. २०२० ने नव्या सवयी अधोरेखित केल्या.

तसेच सर्व उत्पन्न गटामध्ये खर्चाची व्याख्या बदलली आहे. त्यामुळे या सर्वाचा बाजारावर परिणाम होईल तसेच कंपन्यांच्या रिअल-टाइम परफॉर्मन्सवरदेखील प्रभाव पडेल. पुढील वर्षीच्या पोर्टफोलिओ धोरणाचा विचार अधिक सर्जनशील पद्धतीने करा.

मागील वर्षाने दिलेल्या धड्यांकडे दुर्लक्ष करू नका. नवी सुरुवात नेहमीच कठीण असते. नव्याची सुरुवात करताना, आपण नेहमीच मागे काय घडले, ते तेथेच सोडले पाहिजे आणि एखाद्या नव्या विचाराने पुढे गेले पाहिजे. २०२१ या वर्षी बाजार रीबूट होताना, तुमच्याकडून उत्तम संधी गमावता कामा नये.

Leave a Comment